Lokmat Money > बिझनेस न्यूज > Alert! 31 जुलैपर्यंत KYC अपडेट केलं नाहीतर बंद होईल तुमचं डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट!

Alert! 31 जुलैपर्यंत KYC अपडेट केलं नाहीतर बंद होईल तुमचं डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट!

demat and trading accounts : नॅशनल सिक्योरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेज (CDSL) ने यावर्षी 7 आणि 5 एप्रिल रोजी सर्क्युलर जारी केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 09:16 PM2021-07-29T21:16:17+5:302021-07-29T21:23:31+5:30

demat and trading accounts : नॅशनल सिक्योरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेज (CDSL) ने यावर्षी 7 आणि 5 एप्रिल रोजी सर्क्युलर जारी केले होते.

your demat and trading accounts will be deactivated by july 31 if you have not given these kyc details | Alert! 31 जुलैपर्यंत KYC अपडेट केलं नाहीतर बंद होईल तुमचं डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट!

Alert! 31 जुलैपर्यंत KYC अपडेट केलं नाहीतर बंद होईल तुमचं डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट!

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे डिमॅट (Demat) आणि ट्रेडिंग (Trading) अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दरम्यान, डिमॅट अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंट असणाऱ्यांना डिपॉझिटरीकडून (Depositories) 31 जुलैपर्यंत केवायसी डिटेल्स पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर तुम्ही 31 जुलैपर्यंत केवायसी डिटेल्स अपडेटेड नसतील तर तुमचे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट डिअॅक्टिव्हेट होऊ शकते. (your demat and trading accounts will be deactivated by july 31 if you have not given these kyc details)

नॅशनल सिक्योरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेज (CDSL) ने यावर्षी 7 आणि 5 एप्रिल रोजी सर्क्युलर जारी केले होते. या सर्क्युलरमधील तपशीलानुसार 31 जुलैपूर्वी केवायसी डिटेल अपडेट करण्याबाबत सांगण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने सहा बाबींचा समावेश आहे-

1. नाव
2. पत्ता
3. पॅन
4. मोबाइल नंबर
5. ईमेल आयडी
6. इन्कम रेंज


दरम्यान, 1 जून 2021 पासून उघडण्यात आलेल्या नव्या अकाउंट्ससाठीवरील सर्व केवायसी माहिती अनिवार्य करण्यात आली आहे. सध्याच्या सर्व अकाउंट्ससाठी मार्केट रेग्यूलेटर सेबीद्वारे डिपॉझिटरीजना ही माहिती व्हेरिफाय करण्यास सांगण्यात आली आहे.


शेअर बाजारात वाढतेय किरकोळ गुंतवणुकदारांची भागीदारी
देशांतर्गत सिक्युरिटीज मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग झपाट्याने वाढला आहे. एप्रिल-जून दरम्यान दरमहा 24.5 लाख डिमॅट खाती उघडली गेली आहेत, असे सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी म्हणाले होते. याचबरोबर, देशाच्या सिक्युरिटीज मार्केटमध्ये गुंतवणूकदारांची आवड वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे सध्याचा कमी व्याज दर आणि पुरेशी लिक्विडिटी उपलब्धता आहे, असेही ते म्हणाले होते. तसेच, लिक्विडिटी कमी झाल्यास किंवा व्याजदर वाढल्यास त्याचा परिणाम बाजारावर होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला होता.

Web Title: your demat and trading accounts will be deactivated by july 31 if you have not given these kyc details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.