Join us

तुमचा EPF टॅक्स फ्री नाही, जमा होणाऱ्या पैशांच्या कोणत्या भागावर लागतो Tax; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 12:50 PM

भविष्य निर्वाह निधी म्हणजे तुमचा तो पैसा जो तुमच्या निवृत्तीसाठी जमा केला जात आहेत. हा पैसा विशेषतः कर्मचारी वर्गासाठी महत्त्वाचा आहे.

EPF Tax deduction: भविष्य निर्वाह निधी म्हणजे तुमचा तो पैसा जो तुमच्या निवृत्तीसाठी जमा केला जात आहेत. हा पैसा विशेषतः कर्मचारी वर्गासाठी महत्त्वाचा आहे. परंतु, अनेक वेळा लोक पैसे काढतात आणि त्यातलं सेव्हिंग कमी करतात. त्याच वेळी, काहींच्या मते इतर आर्थिक साधनांपेक्षा त्यात अधिक व्याज मिळाल्यास अधिक पैसे गुंतवले पाहिजेत. दरम्यान, दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. अनेक लोक हा प्रश्न विचारतात की त्यांचे ईपीएफचे पैसे करमुक्त आहेत का? याचं उत्तर होय आणि नाही दोन्हीही आहे.

ईपीएफ अकाऊंटवर डिपॉझिट २.५ लाखांपेक्षा अधिक पैशांवर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जातो. १ एप्रिल २०२२ मध्ये सरकारनं नियमांमध्ये बदल केले होते. १ एप्रिल २०२२ पासून तुमच्या ईपीएफ अकाऊंटमध्ये जमा होणाऱ्या पैशांवर जे व्याज मिळेल त्यावर टॅक्स लागणार आहे. याला टीडीएस- टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स कॅटेगरीत ठेवण्यात आलेय. परंतु याचं कॅलक्युलेशन कसं होतंय हे समजणं आवश्यक आहे. 

काय आहे टॅक्सचं गणित?सरकारनं पीएफ अकाऊंटचा अधिक फायदा उचलणाऱ्यांमुळे हे पाऊल उचललंय. फायनान्स अॅक्ट २०२१ (Finance act 2021) मध्ये नवी तरतूद जोडण्यात आली.  जर कोणताही प्रोविडंट फंड कर्मचारी एका आर्थिक वर्षात २.५ लाखांपेक्षा अधिक कॉन्ट्रिब्युट करत असेल तर त्याला २.५ लाखांपेक्षा वरच्या डिपॉझिटवर मिळालेल्या व्याजावर टॅक्स भरावा लागेल. जर तुमच्या खात्यात ३ लाख रुपये असतील तर अतिरिक्त ५० हजार रुपयांवर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स भरावा लागेल. एका आर्थिक वर्षात जमा रकमेच्या आधारावर हा कर आकारला जाईल. खाली दिलेल्या टेबलनुसार हे समजून घ्या.

नव्या नियमांनुसार प्रोव्हिडंट फंडात दोन अकाऊंट मेंटेन केले जात आहेत. एक टॅक्सेबल आणि दुसरा नॉन टॅक्सेबल अकाऊंट. प्रोविडंट फंड कॉन्ट्रिब्युशनवर (Tax on EPF contribution) मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स कॅलक्युलेशन होतं. रुल 9D वरून टॅक्सेबल व्याजाची गणना कशी होईल हे सजमतं. सोबतच दोन अकाऊंट मॅनेज करावं लागेल आणि कंपनीला काय करावं लागेल हे यातून समजतं.

दोन अकाऊंट कशीआता पीएफमध्ये दोन अकाऊंट असतील. पहिलं टॅक्सेबल आणि दुसरं नॉन टॅक्सेबल अकाऊंट.नॉन टॅक्सेबल अकाऊंट - जर एखाद्याच्या ईपीएफ अकाऊंटमध्ये ५ लाख रुपये असतील तर नव्या नियमानुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत जमा रक्कम विना टॅक्सच्या खात्यात जमा होईल. यावर कोणताही टॅक्स लागणार नाही. 

टॅक्सेबल - सध्याच्या आर्थिक वर्षा कोणत्याही ईपीएफ अकाऊंटमध्ये २.५० लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा असेल तर अतिरिक्त मिळणारं व्याज कराच्या कक्षेत येतं. यावर कॅलक्युलेशनसाठी अन्य रक्कम टॅक्सेबल अकाऊंटमध्ये जमा होईल. त्यात जे व्याज मिळेल त्यावर वर दाखवलेल्या टेबलनुसार टॅक्स कट होईल. 

टॅग्स :गुंतवणूकभविष्य निर्वाह निधीइन्कम टॅक्स