Lokmat Money > बिझनेस न्यूज > PM Awas Yojana : PM Awas योजनेंतर्गत तुमची लोनची सबसिडी परतही घेतली जाऊ शकते; पाहा डिटेल्स, तयार ठेवा 'ही' डॉक्युमेंट्स

PM Awas Yojana : PM Awas योजनेंतर्गत तुमची लोनची सबसिडी परतही घेतली जाऊ शकते; पाहा डिटेल्स, तयार ठेवा 'ही' डॉक्युमेंट्स

PM Awas Yojana Subsidy : काही विशिष्ट परिस्थितीत सरकार पीएमएवाय योजनेअंतर्गत देण्यात येणारं व्याजावरील अनुदान काढून घेऊ शकते, याची अनेकांना माहिती नाही. जाणून घेऊ कोणती आहेत कारणं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 10:17 AM2024-10-08T10:17:21+5:302024-10-08T10:20:11+5:30

PM Awas Yojana Subsidy : काही विशिष्ट परिस्थितीत सरकार पीएमएवाय योजनेअंतर्गत देण्यात येणारं व्याजावरील अनुदान काढून घेऊ शकते, याची अनेकांना माहिती नाही. जाणून घेऊ कोणती आहेत कारणं?

Your loan subsidy can also be withdrawn under the PM Awas yojana scheme View details prepare these documents | PM Awas Yojana : PM Awas योजनेंतर्गत तुमची लोनची सबसिडी परतही घेतली जाऊ शकते; पाहा डिटेल्स, तयार ठेवा 'ही' डॉक्युमेंट्स

PM Awas Yojana : PM Awas योजनेंतर्गत तुमची लोनची सबसिडी परतही घेतली जाऊ शकते; पाहा डिटेल्स, तयार ठेवा 'ही' डॉक्युमेंट्स

PM Awas Yojana Subsidy : पंतप्रधान आवास योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर केंद्र सरकारनं ९ ऑगस्ट २०२४ रोजी पीएमएवाय २.० लाँच केली. ही योजना क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम (सीएलएसएस) आहे जी व्यक्तींना घर खरेदी किंवा बांधण्यासाठी मदत करते. मात्र, काही विशिष्ट परिस्थितीत सरकार पीएमएवाय योजनेअंतर्गत देण्यात येणारं व्याजावरील अनुदान काढून घेऊ शकते, याची अनेकांना माहिती नाही.

सबसिडी कधी काढता येईल?

इकॉनॉमिक टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार पंजाब नॅशनल बँकेचे जनरल मॅनेजर अमरेंद्र कुमार यांच्या मते, सबसिडी काढून घेण्यासाठी तीन प्रमुख परिस्थिती कारणीभूत ठरू शकतात.

  • जर एखादा कर्जदार कर्ज फेडत नसेल आणि त्याचे खातं एनपीए बनल्यास.
  • अनुदान आधीच देण्यात आलं असलं तरी काही कारणास्तव घराचं बांधकाम रखडलं असल्यास.
  • एक वर्षाच्या आत वापर/शेवटच्या वापराचा दाखला सादर न केल्यास.
     

पीएमएवाय सबसिडी कशी कार्य करते?

पीएमएवाय अंतर्गत कर्जदाराच्या कर्जाच्या खात्यात सुरुवातीलाच व्याजावरील अनुदान जोडलं जातं, ज्यामुळे त्यांचा ईएमआय कमी होतो. या योजनेअंतर्गत कर्जदारांना विविध श्रेणीनुसार अनुदान मिळते. उदाहरणार्थ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्पन्न गट (एलआयजी) यांना ६.५% व्याज अनुदान मिळतं.

ईएमआयवर कसा परिणाम होईल?

सबसिडी काढून घेतल्यास कर्जदाराच्या ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते. आयएमजीसीचे सीओओ अनुज शर्मा यांच्या मते, पीएमएवाय सबसिडीमुळे कर्जदाराचा प्रभावी व्याजदर कमी होतो. सबसिडी संपल्यास कर्जदाराला पुन्हा मूळ व्याजदरानुसार कर्जाची परतफेड करावी लागेल, ज्यामुळे त्यांचा ईएमआय वाढेल.

हेही लक्षात ठेवा

कोणत्या परिस्थितीत अनुदान काढता येईल, याची माहिती कर्जदारांनी त्यांच्या बँकेकडून घ्यावी. याशिवाय युटिलायझेशन सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला अशी सर्व आवश्यक कागदपत्रं तयार ठेवणं गरजेचं आहे.

Read in English

Web Title: Your loan subsidy can also be withdrawn under the PM Awas yojana scheme View details prepare these documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.