लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : निवडणुकीनंतर मोबाइल बिल, ब्रॉडबँडचे बिल वाढण्याची शक्यता आहे. टेलिकॉम उद्योगात १५ ते १७ टक्के दरवाढ होईल, याचा फायदा एअरटेलला होईल, असा अंदाज अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे.
यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये २० टक्क्यांची शेवटची वाढ करण्यात आली होती. टॉप दोन कंपन्या प्रीपेड मोबाइल सेवा वापरणाऱ्यांसाठी कमीत कमी रिचार्जची किंमत वाढवत आहेत. शिवाय रिचार्जचा दर तोच ठेवून कालावधी कमी करण्याची शक्कल लढवताना दिसत आहेत.
कोणाचे किती
युजर्स वाढले/घटले?