नवी दिल्ली : जुलैपासून सर्व मोबाइल १३ अंकी होणार असल्याच्या बातम्यांची चर्चा गेल्या २ दिवसांपासून देशात रंगली असली, तरी तसे होणार नाही आणि मोबाइल क्रमांक १0 अंकीच राहतील, असे दूरसंचार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.आॅक्टोबरपासून सुरुवातएमटूएम मोबाइल क्रमांक १३ अंकी करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया १ आॅक्टोबरपासून सुरू होणार असून, ती ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. एमटूएम मोबाइल ग्राहकांना या काळात आपले क्रमांक १३ अंकी करून घेणे बंधनकारक आहे.दूरसंचार मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी एक पत्रक प्रसिद्धीस दिले होते. त्यात यामध्ये एमटूएम (मशिन टू मशिन) मोबाइल नंबर १0 वरून १३ अंकी होणार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. मात्र, त्यामुळे आपल्या मोबाइलचा क्रमांकही १३ अंकी होईल, असे वाटल्याने लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. एवढा मोठा क्रमांक लक्षात कसा ठेवायचा, अशी चर्चाही सुरू झाली होती.सामान्य मोबाइल क्रमांक व एमटूबदलणार असा समज पसरला होता, परंतु सामान्य मोबाइल क्रमांक आणि एमटूएम क्रमांक हे वेगवेगळे प्रकार आहेत. एमटूएम मोबाइल क्रमांक स्वाइप मशिन्स, कार, विजेचे मीटर्स आदी उपकरणांसाठी वापरले जातात. तेच क्रमांक केवळ १३ अंकी होणार असून, हा बदल सामान्य ग्राहकांसाठी नाही, असे मोबाइल कंपन्यांनी स्पष्ट केले आहे.
तुमचा मोबाइल राहणार 10 अंकीच, एमटूएम मोबाइलच होणार १३ अंकांच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 4:20 AM