pan card is active or inactive : आधारकार्ड नंतर देशात पॅनकार्डशिवाय तुमचं पानही हलू शकत नाही. आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅनकार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. बँक खाते उघडणे, कर भरणे इत्यादी अनेक कारणांसाठी याचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त, आपण ओळखपत्र म्हणून देखील वापरू शकतो. पॅन कार्डवर तुमचे नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव/पतीचे नाव सोबत १० अंकी क्रमांक लिहिलेला असतो. अनेकवेळा तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होते. अशा स्थितीत पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करणे अत्यंत आवश्यक आहे. हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरुनही करू शकता.
अनेकवेळा पॅन कार्ड आपोआप निष्क्रिय होते. याची अनेक कारणे असू शकतात. पॅन-आधार लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होते. याशिवाय, एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास, आयकर विभाग पॅन कार्ड निष्क्रिय करते. तुमचे पॅन कार्ड सक्रिय आहे की नाही हे देखील तुम्ही ऑनलाइन सहज तपासू शकता.
पॅन कार्ड सक्रिय की निष्क्रिय असे तपासा?
- सर्वप्रथम आयकर विभागाच्या पोर्टलवर जा. यासाठी https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या वेसबाईटला भेट द्या.
- आता Quick Links पर्यायावर जाऊन “Verify PAN Status” वर क्लिक करा.
- नवीन पेज उघडल्यावर, पॅन क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि PAN वर नोंदणीकृत मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा आणि Continue वर क्लिक करा.
- नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मिळालेला OTP प्रविष्ट करा आणि Validate वर क्लिक करा.
- यानंतर तुमच्यासमोर हिरव्या रंगाची टिक असलेला मेसेज येईल. यामध्ये लिहिलेले असेल – पॅन सक्रिय आहे आणि तपशील पॅननुसार आहेत. येथे तुम्ही सर्व तपशील तपासू शकता.
- जर हिरव्या रंगाची टीक असलेला मॅसेज आला नाही तर तुमच्यासमोर कारण येईल.
- पॅनसोबत आधार लिंक नसेल तर तुम्हाला १ हजार दंड भरुन ते लिंक करण्याचा पर्याय मिळेल.
- त्यानंतर तुमचे पॅनकार्ड सक्रीय होऊन जाईल.