Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिना ५८ हजार कमाई, तरुणाला आयकर विभागाने पाठवली ११३ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

महिना ५८ हजार कमाई, तरुणाला आयकर विभागाने पाठवली ११३ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेशमधील एका तरुणाला आयकर विभागाने ११३ कोटींची नोटीस पाठवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 11:41 AM2023-04-06T11:41:19+5:302023-04-06T11:42:20+5:30

मध्य प्रदेशमधील एका तरुणाला आयकर विभागाने ११३ कोटींची नोटीस पाठवली आहे.

youth earns 58 thousand a month income tax people sent notice of 113 crores | महिना ५८ हजार कमाई, तरुणाला आयकर विभागाने पाठवली ११३ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

महिना ५८ हजार कमाई, तरुणाला आयकर विभागाने पाठवली ११३ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

आयकर विभाग कर चुकवणाऱ्यांना नोटीस पाठवत असते. देशात अनेकजण आजही कर चुकवतात. पण, सध्या आयकर विभागाने पाठवलेल्या नोटीस व्हायरल झाल्या आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी एका मजुराला नोटीस पाठल्याचे समोर आले होते, सध्या अशीच एक नोटीस व्हायरल झाली आहे. यात महिना पन्नास हजार रुपये कमावणाऱ्या तरुणाला ११३ कोटींची नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे. २०११-१२ दरम्यान खात्यावर झालेल्या व्यवहारासाठी पाठवली आहे. याअगोदरही याच तरुणाला साडे तीन कोटी रुपयांची नोटीस पाठवली होती. यासह त्या युवकाच्या दोन साथीदारांनाही नोटीस पाठवली आहे. 

या तरुणाचे नाव रवि गुप्ता असं आहे, याअगोदरही त्यांना आयकरची साडे तीन कोटींची नोटीस आली होती. ही नोटीस वर्ष २०१९ ला मिळाली होती. २०११-१२ मधील व्यवहारा संदर्भात ही नोटीस होती, या प्रकरणी पीएम ऑफीसद्वारा चौकशीही झाली होती.गुप्ता यांनी या प्रकरणी सीबीआय आणि ईडीकडेही तक्रार करुन चौकशीची मागणी केली होती, पण याची चौकशी करण्यात आली नसल्याचे गुप्ता यांनी सांगितले. 

7th Pay Commission: मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देणार खुशखबर! फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठी अपडेट, जाणून घ्या किती वाढणार पगार

'२०११-१२ मध्ये ते इंदूरमध्ये एका बीपीओ मध्ये काम करत होतो. मला महिन्याला फक्त सात हजार रुपये पगार मिळत असे.होतो तेव्हा नोटीस प्रकरणी जानेवारी २०२० मध्ये TOI अहवालानंतर, पीएमओ ऑफिसने हे प्रकरण वित्त मंत्रालयाकडे पाठवले, भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकेकडे पाठवले, असंही गुप्ता म्हणाले. यावेळी मला आरबीआयने दोषमुक्त करणारा अहवाल देखील सादर केला होता, पण २८ मार्च रोजी नवीन नोटीस जारी करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून रवी गुप्ता या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी केंद्रीय यंत्रणांशी संपर्क साधत आहेत. पण अजुनही माहिती मिळालेली नाही. 

गेल्या काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमधील एका मजुरी करणाऱ्या व्यक्तीला आयकर विभागाची नोटीस मिळाली होती. या प्रकरमी त्यांनी प्रशासनाकडे तक्रार दिली होती. यावेळी त्यांच्या जुन्या कागदपत्रांचा वापर करुन फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 

Web Title: youth earns 58 thousand a month income tax people sent notice of 113 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.