Lokmat Money > बिझनेस न्यूज > मंदी, कपातीमध्ये तरुणांची फ्रीलान्सिंग कामाला पसंती

मंदी, कपातीमध्ये तरुणांची फ्रीलान्सिंग कामाला पसंती

माेबदलाही उत्तम, कामाचेही समाधान; वर्षभरात वाढणार मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 09:33 AM2023-06-03T09:33:15+5:302023-06-03T09:33:31+5:30

माेबदलाही उत्तम, कामाचेही समाधान; वर्षभरात वाढणार मागणी

Youth prefer freelancing work amid recession job cuts getting more money | मंदी, कपातीमध्ये तरुणांची फ्रीलान्सिंग कामाला पसंती

मंदी, कपातीमध्ये तरुणांची फ्रीलान्सिंग कामाला पसंती

नवी दिल्ली : एकीकडे जागतिक मंदीचे सावट आणि दुसरीकडे कंपन्यांनी राबविलेले कर्मचारी कपातीचे धाेरण, अशा दुहेरी काेंडीत अडकलेल्या व्यावसायिकांना फ्रीलान्सिंग हा एक उत्तम पर्याय म्हणून समाेर आला आहे. केवळ कर्मचारीच नव्हे तर कंपन्यांनाही हा पर्याय फायदेशीर ठरत आहे.

पेयाेनियरच्या फ्रीलान्सर इनसाइट्स या अहवालातून याकडे लक्ष वेधले गेले आहे. फ्रीलान्सर म्हणून काम करणारे लाेक खूश आहेत. जगभरातील ८३ टक्के लाेकांनी ही भावना व्यक्त केली आहे. ४६ टक्के लाेकांना वाटते की कामाची मागणी यावर्षी वाढणार आहे. 

या ठिकाणी शाेधतात काम
सर्वेक्षणानुसार, फ्रीलान्सर्स कामासाठी अपवर्क, फीवर, ग्रबहब यासारख्या ऑनलाइन ठिकाणांवर अवलंबून आहेत. भारतात १३ टक्के फ्रीलान्सर्स फेसबुक व इतर साेशल मीडियावर आणि ७ टक्के लिंक्डइनसारख्या ठिकाणी ऑनलाईन कामे शाेधतात.

फ्रीलान्सिंगसमाेरील ही आहेत आव्हाने 

  •     नवे ग्राहक शाेधणे    ७३%
  •     वेळेचे व्यवस्थापन    ३८%
  •     पैशांसंबंधी वाटाघाटी    २९%
  •     नव्या देशांत काम शाेधणे    २६%
  •     माेबदला मिळविणे    २२%
  •     ग्राहकांसाेबत चर्चा    १८%
  •     नव्या लाेकांची नियुक्ती    १३%

Web Title: Youth prefer freelancing work amid recession job cuts getting more money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.