Lokmat Money > बिझनेस न्यूज > युआन घसरणीचा हस्तशिल्प निर्यातीला फटका

युआन घसरणीचा हस्तशिल्प निर्यातीला फटका

चीनचे चलन युआनचे अवमूल्यन झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात भारताच्या हस्तशिल्प निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हस्तशिल्प

By admin | Published: August 17, 2015 11:23 PM2015-08-17T23:23:16+5:302015-08-17T23:23:16+5:30

चीनचे चलन युआनचे अवमूल्यन झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात भारताच्या हस्तशिल्प निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हस्तशिल्प

Yuan disrupted handicrafts exports | युआन घसरणीचा हस्तशिल्प निर्यातीला फटका

युआन घसरणीचा हस्तशिल्प निर्यातीला फटका

नवी दिल्ली : चीनचे चलन युआनचे अवमूल्यन झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात भारताच्या हस्तशिल्प निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हस्तशिल्प निर्यातीला जागतिक बाजारपेठेतील नरमाईचा आधीच फटका बसलेला आहे.
हस्तशिल्प निर्यात संवर्धन परिषदेने (ईपीसीएच) म्हटले आहे की, युआनच्या अवमूल्यनामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अडचणींना तोंड द्यावे लागेल, पर्यायाने चीनच्या हस्तशिल्प निर्यातदारांना भारतीय उत्पादनांच्या तुलनेत प्राधान्य मिळेल. स्पर्धा कमी होऊन त्याचा फटका आमच्या निर्यातीला बसेल, असे ईपीसीएचचे उपाध्यक्ष राजेश कुमार जैन यांनी सांगितले. आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये देशाच्या हस्तशिल्पाची निर्यात ७.६६ टक्क्यांनी कमी होऊन १.३८ अब्ज डॉलरची झाली.

Web Title: Yuan disrupted handicrafts exports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.