नवी दिल्ली : चीनचे चलन युआनचे अवमूल्यन झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात भारताच्या हस्तशिल्प निर्यातीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. हस्तशिल्प निर्यातीला जागतिक बाजारपेठेतील नरमाईचा आधीच फटका बसलेला आहे.हस्तशिल्प निर्यात संवर्धन परिषदेने (ईपीसीएच) म्हटले आहे की, युआनच्या अवमूल्यनामुळे भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अडचणींना तोंड द्यावे लागेल, पर्यायाने चीनच्या हस्तशिल्प निर्यातदारांना भारतीय उत्पादनांच्या तुलनेत प्राधान्य मिळेल. स्पर्धा कमी होऊन त्याचा फटका आमच्या निर्यातीला बसेल, असे ईपीसीएचचे उपाध्यक्ष राजेश कुमार जैन यांनी सांगितले. आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये देशाच्या हस्तशिल्पाची निर्यात ७.६६ टक्क्यांनी कमी होऊन १.३८ अब्ज डॉलरची झाली.
युआन घसरणीचा हस्तशिल्प निर्यातीला फटका
By admin | Published: August 17, 2015 11:23 PM