Join us

युआनने सोन्याला भारतात दिली चमक

By admin | Published: August 13, 2015 10:08 PM

दागिने निर्मात्यांकडून आणि विदेशात मागणी वाढल्यामुळे गुरुवारी सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या वाढत्या भावाची झळाळी कायम राहिली. सोने सहाव्या दिवशी

नवी दिल्ली : दागिने निर्मात्यांकडून आणि विदेशात मागणी वाढल्यामुळे गुरुवारी सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या वाढत्या भावाची झळाळी कायम राहिली. सोने सहाव्या दिवशी १० ग्रॅममागे १९० रुपयांनी वाढून २६,१९० रुपयांवर गेले. औद्योगिक क्षेत्राकडून मागणी वाढताच चांदीच्या भावात किलोमागे ४०० रुपयांची झळाळी निर्माण होऊन ती ३६,१०० रुपयांवर गेली.चीनचे चलन युआनचे गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी अवमूल्यन झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून त्याचबरोबर हंगामी मागण्या पूर्ण करण्यासाठी दागिने निर्मात्यांकडून मागणी वाढताच जागतिक बाजारात सोन्याचे भाव वधारले. याशिवाय सप्टेंबर २०१३ नंतर प्रथमच रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ६५ पैशांनी खाली येऊन ६५.१७ रुपये झाला. त्याचा परिणाम आयात महाग होऊन सोने वधारले, असे विश्लेषक म्हणाले. न्यूयॉर्कमधील सोन्याचे भाव हे येथील सोन्याचे भाव साधारणत: निश्चित करतात. न्यूयॉर्कमध्ये बुधवारच्या व्यवहारात सोने एका औंसमागे १.५२ सेंटस्ने महाग होऊन ११२५.५० अमेरिकन डॉलर झाले, तर चांदी एका औंसमागे १.१७ सेंटस्ने वाढून १५.५४ अमेरिकन डॉलर झाली. राजधानी दिल्लीत ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने १० ग्रॅममागे प्रत्येकी १९० रुपयांनी महाग होऊन अनुक्रमे २६,१९० व २६,०४० रुपये झाले. गेल्या पाच सत्रांमध्ये सोने १,०२० रुपयांनी महाग झाले. ८ ग्रॅम्सच्या सोन्याच्या नाण्याचा भाव विखुरलेल्या व्यवहारात २२,४०० रुपये असा स्थिर राहिला. वधारण्याचा हा क्रम चांदीनेही (रेडी) कायम राखत ३६,१०० रुपये किलोचा टप्पा गाठला. वीकली बेसड् डिलिव्हरीमध्ये चांदी ४६५ रुपयांनी महाग होऊन ३५,८७५ रुपये किलोवर गेली. दुसऱ्या बाजूला चांदीची नाणी (१०० नग) एक हजार रुपयांनी महाग होऊन खरेदीसाठी ५० हजार, तर विक्रीसाठी ५१ हजार रुपयांवर गेली.