मायक्रोसॉफ्ट कॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नडेला (Satya Nadella) आणि त्यांची पत्नी अनु यांचा मुलगा झेन नडेला यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तो २६ वर्षांचा होता. त्याला जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी या आजारानं ग्रासलं होतं. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये झेनच्या निधनासंबंधी सांगितलं आहे. या संदेशात अधिकाऱ्यांना नडेला कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास सांगितलं आहे.२०१४ मध्ये सीईओपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर नडेला यांनी दिव्यांग व्यक्तींना उत्तम सेवा देण्यासाठी कंपनीचं प्रोडक्ट डिझाईन करण्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं होतं. यासाठी त्यांनी आपला मुलगा झेनचं उदाहरणही दिलं होतं. मागील वर्षी द चिल्ड्रन हॉस्पीटलनं (या ठिकाणी झेनवर उपचार करण्यात आले होते) नडेलाज यांना जॉईन केलं होतं. आता सिएटल चिल्ड्रेन सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह ब्रेन रिसर्चचा भाग म्हणून झेन नडेला एडेड चेअर इन पॅडेट्रिक न्यूरोसायन्सची स्थापना केली जाणार आहे."झेनला संगीताची खुप आवड होती. त्याचं हास्य आणि आपलं कुटुंब आणि प्रियजनांसाठी त्यानं दिलेला आनंद कायमच लक्षात ठेवला जाईल," अशी प्रतिक्रिया मुलांच्या रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ स्परिंग यांनी आपल्या संचालक मंडळाला लिहिलेल्या संदेशाद्वारे दिली.
Satya Nadella Son Death: मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांच्या २६ वर्षीय मुलाचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 12:23 PM