झेन टेक्नॉलॉजीज या ड्रोन निर्माता कंपनीचा शेअर जून तिमाहीच्या निकालानंतर गेल्या एका आठवड्यातच 36 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. या शेअरने या वर्षात आतापर्यंत 343% हून अधिकचा परतावा दिला आहे. शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 853.85 रुपये एवढा आहे. तर निचांक 175.15 रुपये एवढा आहे. महत्वाचे म्हणजे, ही कंपनी डिफेन्स ट्रेनिंग सोल्यूशन परवण्याबरोबरच ड्रोन आणि अँटी-ड्रोन सॉल्यूशनचाही पुरवठा करते.
55.70 रुपयांवरून 819.50 रुपयांवर पोहोचला -
झेन टेक्नॉलॉजीजचा शेअर्स गेल्या 8 वर्षांत 1371 टक्क्यांनी वधारला आहे. या कालावधीत हा शेअर 55.70 वरून 819.50 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 5 वर्षांचा विचार करता, या शेअरने 882 टक्क्यांपर्यंतचा बम्पर परतावा दिला आहे. गेल्या केवळ सहा महिन्यांच्या कालावधीतच या शेअरने तब्बल 288 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.
याशिवाय, एका महिन्याचा विचार करता एक महिन्यापूर्वी गुंतवणूक करणाऱ्यांना या शेअरने 70.45 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर गेल्या पाच दिवसांत या शेअरने तब्बल 34.69 टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला आहे.
असा राहिला रिजल्ट -
जून तिमाहीत कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या 8.21 कोटींहून वाढून 47.13 कोटी रुपयांवर पोहोचला. तसेच विक्री 33.23 कोटी रुपयांवरून चार पट वाढून 132.45 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. एबिटा मार्जिन मार्च महिन्यात 35.65 टक्के आणि एक वर्षापूर्वीच्या तिमाहीच्या 37.80 टक्क्यांच्या तुलनेत वाढून 50.93 टक्क्यांवर पोहोचली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)