Join us

Kaivalya Vohra: झेप्टोने झपाटले! सहसंस्थापक कैवल्य बनला देशातील सर्वात श्रीमंत तरुण उद्योजक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 11:49 PM

कैवल्य याचे वय अवघे १९ वर्षे आहे. ते देशातील सर्वात श्रीमंत टीनएजर बनला आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या IIFL वेल्थ हुरून 2022 ची यादी प्रसिद्ध झाली आहे.

जगात असे काही लोक आहेत, जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले आहेत. तर असे अनेक लोक आहेत, जे स्वकष्टाने यशस्वी झाले आहेत. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे लोक मोठे झाले आहेत. यामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत बनलेले गौतम अदानी आहेतच, पण कमी वयात देशातील सर्वाधिक श्रीमंत युवा उद्योजक बनण्याचा मान झेप्टोचे संस्थापक कैवल्य व्होरा याला मिळाला आहे. 

कैवल्य याचे वय अवघे १९ वर्षे आहे. ते देशातील सर्वात श्रीमंत टीनएजर बनला आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या IIFL वेल्थ हुरून 2022 ची यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीत कैवल्या याेने पहिल्यांदाच स्थान मिळविले आहे. फिजिक्सवालाचे सह-संस्थापक अलख पांडे यांच्यासह इतर अनेक स्टार्ट-अप संस्थापक देखील प्रथमच या यादीत सामील झाले आहेत.

वोहरा वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी देशातील सर्वात श्रीमंत तरुण बनला आहे. त्याच्याकडे 1,000 कोटींहून अधिक संपत्ती आहे. त्याने 2020 मध्ये आदित पलिचा सोबत झेप्टोची स्थापना केली. गेल्या एका वर्षात या कंपनीचे मूल्यांकन 50 टक्क्यांहून अधिक वाढले आहे. याचा थेट फायदा कैवल्य व्होरा याला झाला आहे. 20 वर्षीय आदिती पालीचाने देखील या यादीत स्थान मिळवले आहे. 10 वर्षांपूर्वी 'श्रीमंतांच्या यादी'मध्ये देशातील सर्वात तरुण श्रीमंत व्यक्ती हा 37 वर्षांचा होता. हे वय आता १९ वर म्हणजेच जवळपास निम्म्याने कमी झाले आहे. 

युनिकॉर्न फिजिक्सवालाचे सह-संस्थापक अलख पांडे (३० वर्षे) आणि प्रतीक महेश्वरी यांनीही या यादीत पहिल्यांदाच स्थान मिळविले आहे. या दोघांकडे 4,000 कोटी रुपयांची वैयक्तिक मालमत्ता आहे आणि सर्वात श्रीमंत असलेल्या 1,103 व्यक्तींच्या यादीत ते 399 व्या क्रमांकावर आहेत. फिजिक्सवाला ही एक एडटेक कंपनी आहे जी कोरोना महामारीच्या काळात स्थापन केली होती.IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार 1,000 कोटी किंवा त्याहून अधिक वैयक्तिक संपत्ती असलेल्या भारतीयांची संख्या 2022 मध्ये प्रथमच 1,100 पेक्षा जास्त झाली आहे. 2021 च्या तुलनेत यंदा या संख्येत 96 अब्जाधिशांची भर पडली आहे. गेल्या पाच वर्षांत ही संख्या ६२ टक्क्यांनी वाढली आहे.