Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्राचे (Mahindra And Mahindra) प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. याशिवाय ते अनेकदा सोशल मीडियाद्वारे आपलं मत किंवा माहितीही शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टना नेटकऱ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो. आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर हँडलवर १० मिनिटांत ग्रोसरी डिलिव्हरीला ‘अमानवीय’ म्हणणाऱ्या एका पोस्टचं समर्थन केलं होतं. परंतु आता झेप्टोचे (Zepto) संस्थापक आदित पलिचा (Aadit Palicha) यांनी त्यांना यासंदर्भात योग्य माहिती दिली आहे.
आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर टाटा मेमोरिअलचे (TATA Memorial) डायरेक्टर प्रमेश यांचं ट्वीट रिट्वीट केलं होतं. त्यांच्या ट्वीटवर आनंद महिंद्रा यांना सहमती दर्शवली होती. “मला या ट्वीटनंतर किती ट्रोल केलं जाईल याची मला काळजी नाही. परंतु १० मिनिटांमध्ये किराणा सामानाची डिलिव्हरी करणं त्या व्यक्तीसोबत अमानवीय आहे. याला बंद करा. ग्राहक २ तास काय ६ तासांच्या डिलिव्हरी टाईमसोबतही जीवंत राहू शकतात,” असं प्रमेश यांनी म्हटलं होतं. तसंच त्यांनी या ट्वीटला स्विगी आणि उबर इट्सलाही टॅग केलं होतं.