Lokmat Money > बिझनेस न्यूज > Zepto Success Story: केवळ २० व्या वर्षी १ हजार कोटींचे मालक, वाचा Zepto च्या संस्थापकांचा इथवरचा प्रवास

Zepto Success Story: केवळ २० व्या वर्षी १ हजार कोटींचे मालक, वाचा Zepto च्या संस्थापकांचा इथवरचा प्रवास

Zepto Success Story: अनेकदा २० व्या वर्षी मुलं कॉलेज, करिअर, रिलेशनशीप अशा गोष्टी करताना दिसतील. पण झेप्टोचे संस्थापक आदित आणि कैवल्य यांना काही दुसरीच गोष्ट खुणावत होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 03:48 PM2022-11-19T15:48:37+5:302022-11-19T15:49:29+5:30

Zepto Success Story: अनेकदा २० व्या वर्षी मुलं कॉलेज, करिअर, रिलेशनशीप अशा गोष्टी करताना दिसतील. पण झेप्टोचे संस्थापक आदित आणि कैवल्य यांना काही दुसरीच गोष्ट खुणावत होती.

zepto success story adit palicha kaivalya vohra networth reach 1000 crore each at age of just 20 know the story of zepto online grocery store | Zepto Success Story: केवळ २० व्या वर्षी १ हजार कोटींचे मालक, वाचा Zepto च्या संस्थापकांचा इथवरचा प्रवास

Zepto Success Story: केवळ २० व्या वर्षी १ हजार कोटींचे मालक, वाचा Zepto च्या संस्थापकांचा इथवरचा प्रवास

Zepto Success Story: वयाच्या 20 व्या वर्षी व्यवसाय सुरू केल्याच्या अनेक गोष्टी तुम्ही वाचल्या असतील. पण, आदित पलिचा आणि कैवल्य वोहरा यांची कहाणी थोडी निराळी आहे. या अर्थाने वेगळे की अवघ्या 18 महिन्यांत दोघांची एकूण संपत्ती 1000-1000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून यशोगाथा ऐकायला मिळतात. पण, अशी यशाची कहाणी क्वचितच सापडते. त्यांचा हा प्रवास केवळ स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची योजना आखणाऱ्या लोकांना प्रेरणा देत नाही तर तरुणांना त्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्याचा संदेशही देते. चला जाणून घेऊया या दोन्ही तरुणांची रंजक कहाणी.

एप्रिल 2021 मध्ये झेप्टोची सुरूवात
अनेकदा 20 व्या वर्षी बहुतेक मुले तुम्हाला कॉलेज, करिअर आणि रिलेशनशीपबद्दल बोलताना आढळतील. पण, आदित आणि कैवल्यला वेगळ्याच गोष्टीत रस होता. त्यांनी मिळून एप्रिल 2021 मध्ये Zepto ची सुरूवात केली. ग्रॉसरी डिलिव्हरी सेवेशी संबंधित हे स्टार्टअप दिग्गज ई-कॉमर्स कंपन्यांना स्पर्धा देत आहे. या वर्षी मे मध्ये, त्यांनी 20 कोटी डॉलर्सचा निधी उभारला. त्यानंतर 90 कोटी डॉलर्स मूल्यांकनाने 'सूनिकॉर्न'चा दर्जा प्राप्त केला. Soonicorn म्हणजे एक अब्ज डॉलर कंपनी (Unicorn) होण्याच्या मार्गावर असलेली कंपनी.
 

बालपणीचे मित्र
पालिचा आणि वोहरा हे बालपणीचे मित्र आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट शिगेला पोहोचली असताना दोघांनाही मुंबईत घरी राहावे लागले. त्यांना घराबाहेर पडता येत नव्हते. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीतही त्यांना अनेक अडचणी येत होत्या. ऑनलाइन ग्रॉसरी कंपन्यांना जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी तीन ते चार दिवस लागत होते. या समस्येत दोन्ही तरुणांना मोठी संधी दिसली.

Stanford University मध्ये मिळाला होता प्रवेश
दोघांनाही शिक्षणासाठी प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला होता. पण, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे ते अमेरिकेला जाऊ शकला नाही. दोघांनीही वर्षभर अभ्यास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने दोघांच्याही पालकांना आश्चर्य वाटले. "आमचे पालक आमच्या निर्णयाने खूप निराश झाले होते. आम्ही आमच्या स्वप्नातील विद्यापीठात जाणार नाही यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता," असं आदितनं सांगितलं.
 

किराणाकार्टपासून प्रवास
या दोघांनी किराणाकार्ट या ग्रॉसरी डिलिव्हरी प्लॅटफॉर्मची सुरूवात केली. ते 45 मिनिटांत किराणा सामान पोहोचवत होते. पिक-अप पॉईंटच्या जवळ राहणाऱ्या ग्राहकांना 15 मिनिटांत डिलिव्हरी दिली जात होती. या प्लॅटफॉर्मवर हे ग्राहक पुन्हा पुन्हा येऊ लागले. यानंतर त्यांच्या मनात विचार आला की 10 मिनिटांत वस्तू का देता येत नाहीत?

क्विक सर्व्हिस आयडिया कामी आली
त्यानंतर झेप्टोचा जन्म झाला. आदित पालिचानं कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी सांभाळली तर आणि कैवल्य वोहरा याने मुख्य चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसरची जबाबदारी हाती घेतली. दोघांनी अनेक गुंतवणूकदारांकडून पैसा उभा केला. आपल्याला मोठे अपार्टमेंट, उत्तम दर्जाची आणि जलद वितरण सेवा हवी आहे याची जाणीव त्यांना संशोधनातून झाली. त्यांनी डार्क स्टोअर नावाच्या मायक्रो डिस्ट्रिब्युशन नेटवर्क सेंटरद्वारे त्यांची सेवा सुरू केली. ग्राहकांना शक्य तितक्या लवकर माल पोहोचवला जावा, हा त्याचा उद्देश होता. त्यासाठी सरासरी अंतर दोन किलोमीटरच्या आत ठेवण्यात आले होते.

गुंतवणूकदारांनी दाखवला विश्वास
"सुरुवातीला काही लोकांनी आम्हाला गांभीर्याने घेतले नाही. आम्ही तरुण होतो, कल्पना धाडसी होती आणि आम्ही आमच्या वयाच्या दुप्पट असलेल्या गुंतवणूकदारांशी बोलत होतो. आमच्यासाठी आणि गुंतवणूकदारांसाठीही हा एक मजेदार अनुभव होता,” असं आदितनं सांगितलं. आमचा योगायोग चांगला होता की आम्हाला काही चांगले गुंतवणूकदार मिळाले. आमची कल्पना जाणून घेतल्यानंतर त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला, असंही त्यांनी नमूद केलं.

Web Title: zepto success story adit palicha kaivalya vohra networth reach 1000 crore each at age of just 20 know the story of zepto online grocery store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.