Join us  

Zerodha Nithin Kamath : दुकानांवरील छोट्या स्पीकरनं कसं बदललं डिजिटल पेमेंटचं जग, काय म्हणतायत नितीन कामथ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2023 3:25 PM

जर तुम्ही रोजच्या आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानात जास असाल आणि फळ-भाज्यांपासून, किराणापर्यंत सर्वच वस्तूंच्या खरेदीसाठी डिजिटल पेमेंटचा वापर करत असाल.

जर तुम्ही रोजच्या आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानात जास असाल आणि फळ-भाज्यांपासून, किराणापर्यंत सर्वच वस्तूंच्या खरेदीसाठी डिजिटल पेमेंटचा वापर करत असाल. अशावेळी त्या ठिकाणी एक छोटा स्पीकर असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. जी रक्कम तुम्ही देता त्याची माहिती त्याद्वारे दुकानदाराला मिळते.

ग्राहकांच्या संख्येनुसार देशातील सर्वात मोठी ठरलेली ब्रोकरेज फर्म झिरोदाचे संस्थापक नितीन कामथ यांनी या छोट्याशा स्पीकरच्या महत्त्वाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ग्राहकांच्या संख्येनुसार देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म झिरोदाचे संस्थापक नितीन कामथ यांनी डिजिटल पेमेंट इकोसिस्टममधील या छोट्या स्पीकरबाबत पोस्ट शेअर केली आहे. भाजीची गाडी, फुलांचं दुकान किंवा तुमच्या गल्लीतील किराणा दुकानातील छोटा स्पीकर फिनटेक कंपन्यांच्या कमाईत मोठी रक्कम जोडण्यात मदतीचा ठरत आहे.

२०२१ मध्ये बहुतांश व्यावसायिकांनी डिजिटल पेमेंट घेण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या काळात डिजिटल पेमेंट केलं आणि सामान विक्रेता सुशिक्षित नसेल तर त्याला लगेच याबद्दल माहिती मिळत नव्हती. अनेक दुकानदार ग्राहकांवर विश्वास ठेवून त्यांना सामान देत होते. यानंतर आसपासच्या दुकानदारांना पेमेंट मिळालंय की नाही हे विचारण्यासाठी बोलावत असत. तसंच घाईत असलेल्या ग्राहकांमुळे त्यांना समस्याही येत होत्या. त्यामुळे काही दुकानदारांनी केवळ कॅश घेऊन सामान विकण्यास सुरूवात केली. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. 

२०१९ मध्ये साऊंड बॉक्स२०१९ मध्ये देशातील प्रमुख फिनटेक कंपनी पेटीएमनं साऊंड बॉक्स डिव्हाईस लाँच केलं. ज्या दुकानदारांना डिजिटल पेमेंट आकारण्यात समस्या येत होत्या त्यांच्यासाठी ते वरदानच ठरलं. हळूहळू असं डिव्हाईस बहुतेक दुकानदारांपर्यंत पोहोचलंय. स्मार्ट डिव्हाईसमध्ये एक स्पीकर, फिनटेक कंपनीचा लोगो, क्युआर कोड आणि सिम कार्ड लावता येतं. अनेक साऊंड बॉक्स इंग्रजीतील मेसेज ट्रान्सलेट करून हिंदी, मराठी, तमिळ, तुलुगू, बंगाली, पंजाबीसारख्या भाषांमध्ये दुकानदाराला माहिती देतात. 

टॅग्स :व्यवसायनितीन कामथ