Lokmat Money > बिझनेस न्यूज > Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath यांना स्ट्रोक, आता कशी आहे प्रकृती? म्हणाले, "मला आश्चर्य..."

Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath यांना स्ट्रोक, आता कशी आहे प्रकृती? म्हणाले, "मला आश्चर्य..."

दिग्गज ब्रोकरेज फर्म झिरोदाचे (Zerodha) फाऊंडर नितीन कामथ यांना स्ट्रोक आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 09:28 AM2024-02-27T09:28:27+5:302024-02-27T09:28:55+5:30

दिग्गज ब्रोकरेज फर्म झिरोदाचे (Zerodha) फाऊंडर नितीन कामथ यांना स्ट्रोक आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Zerodha founder Nithin Kamath suffered a mild stroke how is his health now given information on social media | Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath यांना स्ट्रोक, आता कशी आहे प्रकृती? म्हणाले, "मला आश्चर्य..."

Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath यांना स्ट्रोक, आता कशी आहे प्रकृती? म्हणाले, "मला आश्चर्य..."

दिग्गज ब्रोकरेज फर्म झिरोदाचे (Zerodha) फाऊंडर नितीन कामथ यांना सहा आठड्यांपूर्वी माईल्ड स्ट्रोक आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याची अनेक कारणं असू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. नितीन कामथ यांनी आपल्या या कठीण काळाबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे माहिती दिली. वडिलांचं निधन, चांगली झोप न घेणं, कमी पाणी पिणं, थकवा आणि कामाचा प्रचंड ताण हे यामागचं कारण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पूर्णपणे बरं होण्यासाठी आपल्याला तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो असंही ते म्हणाले.
 

पूर्ण बरं होण्यासाठी सहा महिने
 

आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या आहेत. लिहिता-वाचता येत नव्हतं, पण आता त्याला हळूहळू ते जमत आहे. आता थोडं बरं वाटत आहे. पूर्णपणे बरं होण्यासाठी तीन ते सहा महिने लागतील, असं नितीन कामत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
 


 

याचं वाटलं आश्चर्य
 

निथिन कामत निरोगी राहण्यावर खूप भर देतात आणि सोशल मीडियावरही त्याबद्दल मत व्यक्त केलंय. अशा स्थितीत, स्ट्रोकबद्दल त्यांना खूप आश्चर्य वाटलं. जो फिट आहे आणि स्वत: ची खूप काळजी घेतो अशा व्यक्तीच्या बाबतीत असं कसं होऊ शकतं, असा प्रश्न त्यांना पडला होता. तुम्ही कधी गिअर डाऊनग्रेड करायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे, असं डॉक्टरांनी सांगितल्यां ते म्हणाले. 
 

पैशांनी चांगलं आरोग्य विकत घेता येत नाही, असंही त्यांनी यापूर्वी एका ट्वीटमध्ये म्हटलं होतं. पत्नी सीमासोबत रोज सकाळी वर्कआऊट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांचं बॉन्डिंग हे एक्सरसाईज प्रमाणे काम करतं, असं नितीन कामथ म्हणाले. त्यांची पत्नी सीमा या कॅन्सरमधून बाहेर आल्या आहेत.

Web Title: Zerodha founder Nithin Kamath suffered a mild stroke how is his health now given information on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.