Join us  

Zerodha Nithin Kamath : झिरोदाच्या नितीन कामत यांनी स्टार्टअप्ससाठी दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, “मार्केटिंगवर पैसा खर्च करतात, पण…”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 7:36 PM

Zerodha चे संस्थापक नितीन कामत यांनी स्टार्टअपशी संबंधित लोकांना एक चांगला सल्ला दिला आहे.

ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म, Zerodha चे संस्थापक नितीन कामत यांनी स्टार्टअपशी संबंधित लोकांना एक चांगला सल्ला दिला आहे. सहसा कोणत्याही स्टार्टअपला त्यांचे युनिक प्रोडक्ट विकण्यात खूप अडचणी येतात. मार्केटिंगवर खूप पैसा खर्च करणार्‍या स्टार्टअपला ब्रँड अॅम्बेसेडर ठेवणे शक्य नसते, तर त्यांच्या उत्पादनाची विक्री आणि वर्ड ऑफ माऊथ पब्लिसिटी याला खूप महत्त्व असते.

कोणताही स्टार्टअप त्यांच्या ब्रँडसाठी लाखो लोकांना सहजपणे ॲम्बेसेडर बनवू शकतो. "स्टार्टअप्स मार्केटिंगवर खूप पैसे खर्च करतात, पण लाखो ब्रँड ॲम्बेसेडर मिळवण्याच्या सोप्या मार्गाकडे दुर्लक्ष करतात,” असे नितीन कामत यांनी आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर म्हणाले. जागतिक स्तरावर, अलिकडच्या वर्षांत IPO आणणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या त्यांच्या सर्वात मोठ्या मालमत्तेकडे दुर्लक्ष करतात. ते आपल्या लाखो अथवा कोट्यवधी रिटेल शेअरधारकांना सोशल मीडियावर ब्रँड अॅम्बेसेडर बनवू शकते असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय.

"जेव्हा एखादा स्टार्टअप व्हेंचर कॅपिटल आणि पीई फर्म्समधून पैसे उभारण्यास सुरुवात करतो, तेव्हा ते त्यांचे व्हॅल्युएशन वाढविण्याचा विचार करू लागतात. ते एक स्टोरी तयार करतात ज्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम व्हॅल्युएशन तयार करण्यात मदत होईल,” असे कामत यांनी म्हटलेय.

काही वेगळे करणे आवश्यक"सूचीबद्ध कंपन्यांना शेअर बाजारात चांगले काम करण्यासाठी काहीतरी वेगळे करणे आवश्यक आहे. शेअर बाजारात चांगली कामगिरी करणे म्हणजे शेअर्समधील चढ उतार कमी व्हावा आणि हळूहळू संपत्ती तयार होत रहावी. एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये तीव्र चढ-उतारांचा गुंतवणूकदारांवर परिणाम होतो. ते घाबरतात आणि किमान स्तरावर कंपनीतून बाहेर पडण्यास सुरुवात करतात,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :व्यवसायट्विटर