झिरोदाचे (Zerodha) सह-संस्थापक निखिल कामथ ओम्निचॅनल ज्वेलरी रिटेलर ब्लूस्टोनमध्ये १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. ही गुंतवणूक फंडिंग राऊंडचा भाग आहे. या फंडिंग राऊंडमध्ये इतर प्रमुख सहभागींमध्ये झोमॅटोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी दीपंदर गोयल आणि अमित जैन, वित्तीय सेवा फर्म IIFL यांचा समावेश आहे. मणिपाल ग्रुपचे चेअरमन रंजन पै आणि इन्फो एज व्हेंचर्स यांचाही फंडिंग राउंडमध्ये सहभाग असल्याचं सांगण्यात येतंय. दोघेही प्रत्येकी १०० कोटी रुपयांचं योगदान देत आहेत. याशिवाय ब्लूस्टोनचे विद्यमान गुंतवणूकदारही या फंडिंग फेरीत सहभागी होत आहेत.
ब्लूस्टोनचे संस्थापक आणि सीईओ गौरव सिंग कुशवाह यांनी या घडामोडीची पुष्टी केल्याची माहिती इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. ब्लूस्टोन ६,५ कोटी डॉलर्सच्या (सुमारे ५५० कोटी रुपये)फंडिंग राउंडला सुरक्षित करण्याच्या अंतिम फेरीत आहे. यानंतर, ब्लूस्टोनचे मूल्यांकन सुमारे ३,६०० कोटी रुपये (४४ कोटी डॉलर्स) होईल.
२०११ मध्ये झालेली सुरुवात
ब्लूस्टोनची सुरुवात २०११ मध्ये झाली. हे Accel Partners आणि Saama Capital यांच्या सीड फंडिंगसह याची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला ते फक्त ऑनलाइन व्यवसाय करत होते. परंतु आता त्यांनी ऑफलाइन मार्केटमध्ये देखील एन्ट्री घेतली आहे. २०१३ पर्यंत, ब्लूस्टोननं १०,००,०००+ युनिक मंथली विझिटर्सचा पल्ला गाठला होता. कंपनीनं २०१८ मध्ये दिल्ली आपलं पहिलं डिजिटली इंटिग्रेटेड एक्सपरिअन्स स्टोअर सुरू केलं. २०२२ मध्ये जयपूरमध्ये तिसरी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी फॅसिलिटी सुरू केली.