गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडिया कंपनी नझारा टेकमध्ये (Nazara Tech) ब्रोकरेज फर्म झिरोदाचे (Zerodha) को फाऊंडर निखिल कामथ (Nikhil Kamath) मोठी गुंतवणूक करणार आहेत. एक्सचेंज फायलिंगद्वारे त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. निखिल कामथ यांची ही गुंतवणूक प्रिफरेन्शिअल अलॉटमेंटद्वारे होणार आहे. कामथ असोसिएट्स अँड एनकेस्क्वॉयर्डला (Kamath Associates & NKSquared) १०० कोटी रुपयांचे शेअर्स जारी करण्यासाठी नझाराच्या बोर्डानं मंजुरी दिली आहे. परंतु याला सध्या शेअर होल्डर्स आणि नियामकांची मंजुरी मिळणं शिल्लक आहे. यापूर्वी १० जुलै रोजी नझाराच्या बोर्डानं इक्विटी शेअर्सद्वारे ७५० कोटी रूपये जमवण्यास मंजुरी दिली आहे.
कोणत्या किंमतीत मिळणार शेअर्सनिखिल कामथ यांना हे शेअर्स ७१४ रुपये प्रति शेअर दरानं मिळणार असल्याची माहिती एक्सचेंज फायलिंगमधून समोर आलीये. शुक्रवार १ सप्टेंबर रोजी बीएसईवर हा शेअर ७५९.२० रुपयांवर बंद झाला होता. तर सोमवारी इंट्रा डेमध्ये हा शेअर १२ टक्क्यांच्या उसळीसह ८५३.८० रुपयांपर्यंत पोहोचला होता.
का करतायत गुंतवणूक?भारतात गेमिंग इंटस्ट्री येत्या वर्षांमध्ये तेजीनं वाढणार आहे, असं या गुंतवणूकीबद्दल झिरोदाच्या संस्थापकांचं मत आहे. या क्षेत्रात कंपनीनं आपली स्थिती मजबूत केली आहे आणि हा गेमिंग प्लॅटफॉर्म नफ्यात चालत आहे. याचा पोर्टफोलियो डायव्हर्सिफाय असल्यानं गेमिंग इंडस्ट्रीमध्ये वाढीसाठी असलेल्या शक्यतांचा फायदा घेण्यासाठी हा उत्तम स्थितीत आहे. यामुळेच निखिल कामथ यांनी नझारा टेकमध्ये पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतलाय. नझारा टेकची ३० मार्च २०२१ रोजी शेअर बाजारात एन्ट्री झाली होती.