Join us  

Zerodha Success Story : एकेकाळी केली ८ हजारांची नोकरी, आज मुकेश अंबानींना टक्कर देण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 10:30 AM

वाचा कशी उभी राहिली शून्यातून झिरोदा ही कंपनी...

देशातील सर्वात मोठ्या ब्रोकरेज फर्मपैकी एक असलेल्या झिरोदाला (Zerodha) सेबीकडू (SEBI) एएमसीसाठी (AMC) लायसन्स मिळाला आहे. यासह, कंपनीला म्युच्युअल फंड लॉन्च करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. कंपनीनं याची जबाबदारी विशाल जैन यांच्याकडे सोपवली आहे. ही एक असेट मॅनेजमेंट कंपनी झेरोधा ब्रोकिंग लिमिटेड (Zerodha Broking Ltd)आणि वेल्थ मॅनेजमेंट कंपनी स्मॉलकेस (Smallcase) यांचा संयुक्त उपक्रम आहे. 

एक कोटी गुंतवणूकदारांना आपल्याशी जोडण्याचं आपलं लक्ष्य असल्याचं कामथ म्हणाले. या व्यवसायात कंपनी मुकेश अंबानी यांच्याशी स्पर्धा करेल. रिलायन्स इंडस्ट्रीजनं अलीकडेच आपला आर्थिक व्यवसाय डिमर्ज केला आहे आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या नावाने त्याच्या लिस्टिंगची तयारी केलीये. कंपनीनं जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉकशी (BlackRock) देखील करार केला आहे. पाहूया कसा होता कामथ बंधूंचा आजवरचा प्रवास.

निखिल आणि नितीन कामत या दोन भावांचं फायनान्स विषयातलं कोणतंही औपचारिक शिक्षण नाही. नितीन कामथ इंजिनिअर आहेत, तर निखिल कामथन यांनी शाळेत असतानाच शिक्षण सोडलं. यामुळेच त्यांना कंपनी स्थापन करण्यासाठी निधीही मिळाला नाही. आजही झिरोधामध्ये कोणीही बाहेरून पैसे गुंतवलेले नाहीत, पण दोन भावांनी स्वबळावर ही कंपनी प्रॉफिटेबल बनवली आहे.

नितीन कामथ यांचा चेहरा अधिक चर्चेत असतो. परंतु, धाकटा भाऊ निखिल कामथ यांची कहाणी काही कमी मनोरंजक नाही. ते सध्या कंपनीचे सह-संस्थापक आणि CFO आहेत. आज आपण त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. ज्या व्यक्तीला शालेय शिक्षणही पूर्ण करता आले नाही, त्याने शिकण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर १६,५०० कोटी रुपयांची कंपनी कशी बनवली. झिरोदाचं व्हॅल्यूएश सुमारे २ अब्ज डॉलर्स आहे.

प्रवास अतिशय रंजकअवघ्या ८ हजार रुपयांच्या नोकरीपासून सर्वात तरुण भारतीय अब्जाधीश होण्यापर्यंतचा निखिल कामथ यांचा प्रवास खूपच रंजक आहे. त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी काम करण्यास सुरुवात केली. त्यांची पहिली नोकरी एका कॉल सेंटरमध्ये होती, जिथे त्यांना फक्त ८ हजार रुपये पगार मिळायचा. यानंतर शेअर मार्केट ट्रेडिंगनं त्यांचा हा प्रवास सुरू झाला. निखिल कामथ यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यांनी शेअर ट्रेडिंग सुरू केलं तेव्हा त्यांनी ते गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र, वर्षभरातच त्यांना बाजाराचं मूल्य समजलं आणि त्यांनी त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांची संपत्ती एवढ्या वेगानं वाढली की आज ते देशातील सर्वात तरुण अब्जाधीश म्हणून समोर आले आहेत.

वडिलांचीही मदतएकदा आपल्या वडिलांनी आपण काही जमवलेली रक्कम त्यांना दिली आणि त्यात मॅनेज करण्यास सांगितलं. तो कामथ यांचं बाजारातील एन्ट्रीचं पहिलं राऊल होतं, असं निखिल कामथ यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं. वडील डोळे बंद करून आपल्यावर विश्वास ठेवत होते, असंही ते म्हणाले. त्यांच्या या विश्वासामुळेच मोठी जबाबदारीही होती की त्यांनी दिलेली रक्कम नीट वापरावी. हळू हळू त्यांचा यात जम बसू लागला आणि त्यांची चांगली कमाई होऊ लागली. यानंतर त्यांनी नोकरी करणं सोडून दिलं आणि इथूनच झिरोदाचा प्रवास सुरू झाला.

नितीन कामथ यांच्यासोबत कामनोकरी सोडल्यानंतर निखील कामथ यांनी त्यांचा मोठा भाऊ नितीन कामथ यांच्यासोबत कामथ असोसिएट्सची सुरुवात केली आणि या माध्यमातून ते शेअर मार्केटमध्ये व्यवहार करायचे. यानंतर २०१० मध्ये दोन्ही भावांनी मिळून झिरोदाची सुरूवात केली.आतापर्यंतच्या संघर्षातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आज मी कदाचित अब्जाधीश झालो आहे, पण यानंतरही काहीही बदललं नाही. आजही मी दिवसातील बहुतांश वेळ काम करतो आणि आयुष्यात या सर्व गोष्टी चुकल्या तर..? याची भीती वाटते,' असंही ते म्हणाले.

टॅग्स :नितीन कामथशेअर बाजार