Join us

तुमचा मोबाईल चुकूनही अनोळखी व्यक्तीला देऊ नका; नितीन कामथांनी सांगितला नवा स्कॅम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:21 IST

Online Money Scam: ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले असून, सायबर ठगांनी आता बँक खात्यातील पैसे परस्पर लुटण्याची नवी पद्धत शोधून काढली आहे. याबद्दल झिरोदाचे नितीन कामथ यांनी माहिती दिली.

New cyber scams: अचानक कुणीतरी तुमच्याजवळ येईल आणि एक कॉल करायला मोबाईल द्या ना प्लिज, असं म्हणेल. आतापर्यंत तुम्ही दिला असेल, पण यापुढे देऊ नका. कारण असं केल्यास कदाचित तुमच्या बँक खात्यातील सगळे पैसे सायबर ठग काढून घेण्याची शक्यता असेल. हो, हे खरं आहे. झिरोदाचे सीईओ नितीन कामथ यांनीच या नव्या स्कॅमबद्दल माहिती दिली आहे. आणि अनोळखी माणसांना मोबाईल देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (Zerodha's Nithin Kamath Shares new Scam Video)

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

नितीन कामथ यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तुमच्याच समोर तुमच्या मोबाईलद्वारे कसा स्कॅम होऊ शकतो याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. 

काय आहे नवीन स्कॅम?

हा व्हिडीओ शेअर करताना कामथ यांनी म्हटले आहे की, अनोळखी व्यक्ती तुमच्याजवळ येऊन मोबाईलवरून एक अर्जंट कॉल करायचं असं म्हणेल. एखादा चांगला माणूस सहज त्याच्या हातात मोबाईल देईल, पण हा नवीन स्कॅम आहे. 

तुमच्या मोबाईलवरील ओटीपी घेऊन तुमचं बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. घोटाळेबाज तुम्हाला कोणतीही जाणीव न होऊ देता हे करू शकतात, असे कामथ यांनी म्हटले आहे. 

कशा प्रकारे तुमची फसवणूक होऊ शकते? हा व्हिडीओ बघा

अनोळखी व्यक्ती घोटाळा करणारा असेल, तर तो तुमच्या मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करून तुमच्या मोबाईलचा एक्सेस त्याच्या मोबाईलमध्ये घेऊ शकतो. त्याचबरोबर फेसबुक आणि इतर खात्यांचा एक्सेसही घेऊ शकतो. इतरही महत्त्वाची माहिती त्याच्याकडे जाऊ शकते. त्यामुळे अनोळखी व्यक्तीला मोबाईल देणे धोकायदायक ठरू शकतं. 

टॅग्स :सायबर क्राइमनितीन कामथगुंतवणूकधोकेबाजी