Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतात बॅन असलेल्या TikTok च्या मालकाचा दिग्गजांना दे धक्का! चीनमध्ये पोहचला सर्वोच्च स्थानी

भारतात बॅन असलेल्या TikTok च्या मालकाचा दिग्गजांना दे धक्का! चीनमध्ये पोहचला सर्वोच्च स्थानी

China Richest Person : कधीकाळी भारतात धुमाकूळ घालणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म TikTok पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या कंपनीचा तरुण मालक आता चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 02:15 PM2024-10-30T14:15:17+5:302024-10-30T14:16:53+5:30

China Richest Person : कधीकाळी भारतात धुमाकूळ घालणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म TikTok पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या कंपनीचा तरुण मालक आता चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.

zhang yiming become china richest person according hurun china rich list | भारतात बॅन असलेल्या TikTok च्या मालकाचा दिग्गजांना दे धक्का! चीनमध्ये पोहचला सर्वोच्च स्थानी

भारतात बॅन असलेल्या TikTok च्या मालकाचा दिग्गजांना दे धक्का! चीनमध्ये पोहचला सर्वोच्च स्थानी

China Richest Person : चीनचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'टिकटॉक'ला कोण विसरेल? या अ‍ॅपने अनेकांना रात्रीत सुपरस्टार केलं. गावखेड्यातील लोकांना मोठं व्यासपीठ मिळालं. या अ‍ॅपने भारतात रील क्रांतीला जन्म दिला. TikTok आणि तिची मूळ कंपनी ByteDance वर केंद्र सरकारने बंदी घातली. आता या धर्तीवर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. मात्र, या टीकॉकने आपल्या तरुण मालकाला चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवलं आहे. त्यांची नेटवर्थ जाणून डोळे पांढरे होतील.

हुरुन चायना रिच लिस्टनुसार, बाइटडान्सचे संस्थापक झांग यिमिंग (Zhang Yiming) हे चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची संपत्ती एका वर्षात ४३ टक्क्यांनी वाढली आहे. या वाढीसह त्यांची एकूण संपत्ती ४९.३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. झांग यांनी २०२१ मध्ये बाइटडान्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता.

गेल्या वर्षी ११० अब्ज डॉलर्सची कमाई
बाइटडान्स कंपनीने गेल्या वर्षी विक्रमी ११० अब्ज डॉलरचा महसूल कमावला होता. मात्र, या काळात कंपनीला अनेकवेळा अमेरिकन कायदेशीर आव्हानांनाही सामोरे जावे लागले. बाइटडान्सने हुरुनच्या यादीतील चीनच्या सर्वात मौल्यवान ५०० कंपन्यांपैकी पहिल्या ५ मध्ये स्थान मिळवले आहे. हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स २०२४ मध्ये हा जगातील सर्वात मौल्यवान युनिकॉर्न होता.

दुसऱ्या क्रमांकावर 'बाटलीबंद पाण्याचा राजा'
'बाटलीबंद पाण्याचा राजा' म्हणून प्रसिद्ध असलेल्या झोंग शानशानला (Zhong Shanshan) मागे टाकून यिमिंगने हुरुनच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. शानशानची संपत्ती २४ टक्क्यांनी घसरून ४७.९ अब्ज डॉलरवर आली आहे. एकेकाळी चीनचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले ६० वर्षीय जॅक मा युन यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी घट झाली आहे. ते आता २३.२ अब्ज डॉलरपर्यंत कमी झाले आहे. या घसरणीमुळे जॅक चीनमधील श्रीमंताच्या यादीत १०व्या क्रमांकावर घसरले आहेत.

भारतात झाली टॉकटॉकची भरभराट
टिकटॉकची सुरुवात २०१६ मध्ये झाली होती. पुढच्या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये कंपनीने भारतात प्रवेश केला. भारतात प्रवेश करताच त्याच्या वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढली. अनेक युजर्सनी छोटे व्हिडीओ म्हणजेच रील्स बनवून त्यावर अपलोड करायला सुरुवात केली. त्याच्या सक्रिय वापरकर्त्यांची संख्या सुमारे २० कोटी होती.

Web Title: zhang yiming become china richest person according hurun china rich list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.