Lokmat Money > बिझनेस न्यूज > 31 मार्च 2018ला संपणार जिओची प्राइम मेंबरशिप, जाणून घ्या पुढे काय ?

31 मार्च 2018ला संपणार जिओची प्राइम मेंबरशिप, जाणून घ्या पुढे काय ?

रिलायन्स जिओनं मोबाइल क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर अनेक कंपन्यांनी ग्राहकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. जिओनं लाँचिंगनंतर सहा महिन्यांपर्यंत मोफत सेवा दिल्यानं ग्राहक जिओवर अक्षरशः तुटून पडले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 06:48 PM2018-03-26T18:48:41+5:302018-03-26T18:48:41+5:30

रिलायन्स जिओनं मोबाइल क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर अनेक कंपन्यांनी ग्राहकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. जिओनं लाँचिंगनंतर सहा महिन्यांपर्यंत मोफत सेवा दिल्यानं ग्राहक जिओवर अक्षरशः तुटून पडले होते.

Zoichi Prime Membership ends on March 31, 2018, learn what to do next? | 31 मार्च 2018ला संपणार जिओची प्राइम मेंबरशिप, जाणून घ्या पुढे काय ?

31 मार्च 2018ला संपणार जिओची प्राइम मेंबरशिप, जाणून घ्या पुढे काय ?

नवी दिल्ली- रिलायन्स जिओनं मोबाइल क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर अनेक कंपन्यांनी ग्राहकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. जिओनं लाँचिंगनंतर सहा महिन्यांपर्यंत मोफत सेवा दिल्यानं ग्राहक जिओवर अक्षरशः तुटून पडले होते. जिओनं सुरुवातीला 99 रुपयांची प्राइम मेंबरशिप ऑफर केली होती. त्यानंतर वर्षभरासाठी कंपनीने रिचार्जसह अनेक ऑफरही आणल्या होत्या.

तसेच 31 मार्च 2018पर्यंतची त्याची वैधता होती. त्यामुळे 31 मार्चपूर्वी जिओकडून आणखी नवी घोषणा करण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 31 मार्च 2018 रोजी देशभरातील रिलायन्स जिओ वापरकर्त्यांची मुदत संपत आहे. या ऑफरला जिओनं गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच केलं होतं. आणि त्याची शेवटची तारीख 31 मार्च 2018 ठेवण्यात आली होती. 99 रुपये देऊन कोणताही जिओ युजर्स 1 वर्ष म्हणजे 31 मार्च 2018पर्यंत प्राइम मेंबरशिप घेऊ शकत होता. परंतु आता 31 मार्च 2018ची प्राइम मेंबरशिपची डेडलाइन संपल्यानंतर पुढे काय होणार आहे, हा प्रश्न वापरकर्त्यांना सतावतो आहे.

जिओ प्राइम मेंबरशिपची सुरुवात 1 एप्रिल 2017ला झाली होती आणि 31 मार्च 2018पर्यंत ती वैध होती. जिओच्या सब्सक्रिप्शनची तारीख लवकरच संपणार असून, नव्या तारखेची घोषणा करण्यात येणार आहे. परंतु अद्यापही याबाबत अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. परंतु लवकरच कंपनी प्राइम सब्सक्रिप्शन तारीख बंद करणार आहे. तसेच ग्राहकांना मोफत सेवेअंतर्गत ती ऑफर केली जाणार आहे. जिओ ग्राहकांसाठी लवकरच नवीन ऑफर आणू शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिओनं यापूर्वीही ग्राहकांना ब-याच वेळा सरप्राइज दिल्या आहेत. टेलिकॉम इंडस्ट्रीचे गेम चेंजर असलेल्या जिओ यावेळी ग्राहकांसाठी कोणती नवी ऑफर घेऊन येतेय, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 

Web Title: Zoichi Prime Membership ends on March 31, 2018, learn what to do next?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.