Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता Zomato ची डिलिव्हरी 10 मिनिटात होणार नाही; जाणून घ्या, कंपनीला का घ्यावा लागला हा निर्णय?

आता Zomato ची डिलिव्हरी 10 मिनिटात होणार नाही; जाणून घ्या, कंपनीला का घ्यावा लागला हा निर्णय?

Zomato : कंपनीची ही सेवा लोकांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली नसल्याचे म्हटले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 05:11 PM2023-01-24T17:11:45+5:302023-01-24T17:14:25+5:30

Zomato : कंपनीची ही सेवा लोकांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली नसल्याचे म्हटले जात आहे.

zomato 10 min delivery service zomato instant is shutting down  | आता Zomato ची डिलिव्हरी 10 मिनिटात होणार नाही; जाणून घ्या, कंपनीला का घ्यावा लागला हा निर्णय?

आता Zomato ची डिलिव्हरी 10 मिनिटात होणार नाही; जाणून घ्या, कंपनीला का घ्यावा लागला हा निर्णय?

नवी दिल्ली : फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने (Zomato) लोकांच्या सोयीसाठी 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी करणारी Zomato Instant ही सेवा अॅपमध्ये जोडली होती, पण आता कंपनी ही सेवा बंद करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. कंपनीने एका वर्षापेक्षा कमी कालावधीत ही सेवा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीची ही सेवा लोकांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली नसल्याचे म्हटले जात आहे.

यासंबंधी माहिती असलेल्या दोन लोकांनी सांगितले की, कंपनीने आपल्या रेस्टॉरंट भागीदाराला याबाबत सांगितले आहे की, कंपनी आपली Zomato Instant सेवा बंद करत आहे. लोकांमध्ये लोकप्रिय नसल्यामुळे ही सेवा कंपनीला नफा देऊ शकलेली नाही. एवढेच नव्हे तर, ठराविक खर्च भरून काढण्यासाठी डेली वॉल्यूमची आवश्यकता होती, तितकी ऑर्डर सुद्धा या सेवेतून येत नव्हती. यासंबंधी एका व्यक्तीने ईटी प्राइमशी संवाद साधताना सांगितले की, कंपनीला 10 मिनिटांची फूड डिलिव्हरी फूड सेवा ज्या स्तरावर घेऊन जायची होती, त्या स्तरापर्यंत पोहोचू शकली नाही, त्यामुळे Zomato Instant सेवा यशस्वी झाली नाही. यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे.

एका सूत्राचे म्हणणे आहे की, ही सेवा बंद केल्यानंतर कंपनी आता लोकांसाठी नवीन उत्पादन लाँच करण्याच्या तयारीत आहे.  दरम्यान,  यावेळी झोमॅटोचे लक्ष कॉम्बो मील आणि थाळी सारख्या लो पॅक केलेल्या फूडवर आहे. सध्या कंपनीने सांगितले आहे की, कंपनी आपली झटपट सेवा त्वरित बंद करणार नाही, परंतु आपल्या सेवेचे रिब्रँड करण्याची तयारी करत आहे. आम्ही आमच्या भागीदारांसोबत नवीन मेनू आणि व्यवसायाचे रिब्रँड करण्यावर काम करत आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. 

Web Title: zomato 10 min delivery service zomato instant is shutting down 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.