फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचा (Zomato) 1.1 टक्के हिस्सा 1,040.50 कोटी रुपयांना विकण्यात आला. ब्लॉक डीलच्या माध्यमातून हा व्यवहार करण्यात आला. ही विक्री जपानच्या टेक दिग्गज आणि इन्व्हेस्टमेंट बँक सॉफ्टबँकनं केल्याचं म्हटलं जात आहे. या बातमीनंतर, 20 ऑक्टोबर रोजी सुरुवातीच्या कामकाजात झोमॅटोचे शेअर्स 2.5 टक्क्यांपर्यंत वाढले. सकाळी, कंपनीचे शेअर्स बीएसईवर 113.50 रुपयांवर उघडले, जे आधीच्या 111.70 रुपयांच्या बंद किंमतीपेक्षा 1.6 टक्क्यांनी अधिक होतं. यानंतर काही वेळातच तो शेअर 2.5 टक्क्यांच्या उसळीसह 114.35 रुपयांवर पोहोचला.
एनएसईवर शेअर मागील सत्रात बंद झालेल्या दरापेक्षा 111.65 रुपयांपेक्षा 2 टक्के अधिक तेजीनं 114 रुपयांवर खुला झाला. त्यानंतर अडीच टक्क्यांच्या वाढीसह 114.50 रुपयांवर पोहोचला. झोमॅटोचं मार्केट कॅप बीएसईनुसार 96,713.98 कोटी रुपये असतील. गेल्या सहा महिन्यांमध्ये झोमॅटोच्या शेअर्समध्ये जवळपास 106 टक्क्यांची वाढ दिसून आली.
112.2 रुपये प्रति शेअर किंमतीवर विक्री
ब्लॉक डीलमध्ये जवळपास 9.30 कोटी शेअर्सची 111.2 रुपये प्रति शेअर किंमतीवर विक्री झाली. आतापर्यंत सॉफ्टबँककडे एंटिटी SVF Growth (Singapore) Pte द्वारे झोमॅटोमध्ये 2.22 टक्क्याचा हिस्सा होता. ऑगस्ट महिन्यात सॉफ्टबँकनं ब्लॉक डील द्वारे झोमॅटोमध्ये 940 कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. नंतर ऑक्टोबरमध्ये पॉलिसीबाझारची पॅरेंट कंपनी पीबी फिनटेकमध्ये 2.54 टक्के हिस्सा 876 कोटी रुपयांना विकला.
2023 मध्ये ब्लॉकडील साठी एक अॅक्टिव्ह इयर राहिलंय आणि प्राईम डेटाबेसच्या आकडेवारीनुसार पीई आणि व्हेन्चर कॅपिटल फर्मनं जानेवारी आणि ऑगस्टदरम्यान ब्लॉक डीलच्या माध्यमातून 57,338 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, जेव्हा याच कालावधीदरम्यान 41,051 कोटी रुपयांची गुंतवणूकही झाली होती.