Lokmat Money > बिझनेस न्यूज > Zomato घेणार Blinkit चा ताबा?, बातमी येताच कंपनीचे शेअर्स झाले धडाम…

Zomato घेणार Blinkit चा ताबा?, बातमी येताच कंपनीचे शेअर्स झाले धडाम…

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्स मंगळवारी जबरदस्त आपटल्याचं पाहायला मिळालं.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 05:07 PM2022-06-07T17:07:46+5:302022-06-07T17:08:30+5:30

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचे शेअर्स मंगळवारी जबरदस्त आपटल्याचं पाहायला मिळालं.

Zomato board to sign off Blinkit acquisition on June 17 shares dropped by 4 percent bse nse stock market | Zomato घेणार Blinkit चा ताबा?, बातमी येताच कंपनीचे शेअर्स झाले धडाम…

Zomato घेणार Blinkit चा ताबा?, बातमी येताच कंपनीचे शेअर्स झाले धडाम…

Zomato Share Price: फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या शेअर्समध्ये मंगळवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सुरूवातीला इंट्रा डेमध्ये कंपनीचे शेअर्स ५.३६ टक्क्यांनी घसरल्याचं दिसून आलं. अखेकच्या सत्रात कंपनीचे शेअर्स ६.७२ टक्क्यांनी घसरून ६५.२० रुपयांवर आले. झोमॅटोच्या ब्लिंकिटच्या अधिग्रहणाबाबतच्या वृत्तानंतर कंपनीचे शेअर्स जबरदस्त आपटल्याचं पाहायला मिळालं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार झोमॅटोच्या संचालक मंडळाची १७ जूनला बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत त्याच दिवशी क्विक कॉमर्स कंपनी ब्लिंकिटच्या अधिग्रहणाच्या करारावर अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे. या डीलवर त्या दिवशी स्वाक्षरीही होऊ शकते. डील अंतर्गत ब्लिंकिटचं व्हॅल्युएशन ७० कोटी डॉलर्स असू शकतं. 

हा व्यवहार निश्चित संख्येत झोमॅटोच्या शेअर्सशी निगडित आहे, जो ब्लिंकिटच्या गुंतवणूकदारांना शेअर स्वॅप कराराच्या एका हिस्स्याच्या रुपात होईल. या डील अंतर्गत झोमॅटोला आपल्या एका शेअरच्या मोबदल्यात ब्लिंकिटचे १० शेअर्स मिळतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लिकिंटच्या गुंतवणूकदारांनाही सहा महिन्यांच्या लॉक इन कालावधीची अपेक्षा आहे. ब्लिंकिटमध्ये यापूर्वीही झोमॅटोनं गुंतवणूक केली आहे. झोमॅटोकडे ब्लिंकिटचा जवळपास १० टक्के हिस्सा आहे.

Web Title: Zomato board to sign off Blinkit acquisition on June 17 shares dropped by 4 percent bse nse stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.