Join us

झोमॅटोने अचानक ६०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं; कंपनीने का घेतला इतका मोठा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 16:33 IST

Zomato Layoffs: ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आपल्या ६०० हून अधिक ग्राहक सपोर्ट कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Zomato Layoffs: अलीकडेच फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने आपल्या नावात बदल करण्याची घोषणा केली होती. कंपनीचे नाव Zomato ऐवजी Eternal Limited करण्याला मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रात झोमॅटोचा दबदबा निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत झोमॅटोने कर्मचाऱ्यांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या ६०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावर घेतल्यानंतर एका वर्षात बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अचानक कामावरुन काढल्यामुळे शेकडो कर्मचारी रस्त्यावर आले आहेत.

नोटीस ने देताच कर्मचाऱ्यांनी कामावरून काढून टाकले मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, झोमॅटो असोसिएट एक्सीलरेटर प्रोग्राम (ZAAP) अंतर्गत कंपनीमध्ये १,५०० कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह्सची नियुक्ती करण्यात आली होती. कंपनीत एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पदोन्नती मिळेल, या आशा कर्मचाऱ्या होती. पण, अचानक कंपनीने टाळेबंदीची घोषणा केल्याने शेकडो कर्मचारी अडचणीत आले आहेत. यापैकी बहुतांश कर्मचारी असे आहेत ज्यांच्या कराराचे नूतनीकरण झाले नाही. त्यांना कोणतीही सूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले.

कंपनीने काय सांगितलं कारण?तोटा भरुन काढण्यासाठी कंपनीने खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहक सेवेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर, कर्मचाऱ्यांची खराब कामगिरी, बेशिस्तपणा, अशी कारणे कर्मचारी कपात करण्यामागे दिली आहेत.

वाचा - तुमच्या मोबाईलवरुनही ऑनलाइन पेमेंट होत नाही? एनपीसीआयने सांगितला उपाय

कंपनीचे नाव बदललंकंपनीचे सीईओ दीपंदर गोयल यांनी सांगितले की, कंपनीचे नाव बदलण्यास परवानगी देण्यात आली आहे. २० मार्च २०२५ पासून कंपनीचे नाव बदलले आहे. झोमॅटोने नियामक फाइलिंगमध्ये कंपनीचे नाव २० मार्च २०२५ पासून “Eternal Limited” केले असल्याची माहिती दिली आहे. गेल्या महिन्यात झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी सांगितले होते की, आमच्या बोर्डाने या बदलाला मान्यता दिली असून मी आमच्या भागधारकांनाही या बदलाला पाठिंबा देण्याची विनंती करतो. ती मंजूर झाल्यास आमची कॉर्पोरेट वेबसाइट zomato.com वरून eternal.com अशी बदलेल.  

टॅग्स :झोमॅटोऑनलाइनस्विगी