Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुंतवणूकदारांना कमाई करण्याची मोठी संधी, लवकरच Zomato कंपनी आणणार IPO; वाचा सविस्तर

गुंतवणूकदारांना कमाई करण्याची मोठी संधी, लवकरच Zomato कंपनी आणणार IPO; वाचा सविस्तर

zomato likely to launch ipo in september here know the details : कंपनीची बाजारपेठेतून 650 मिलियन डॉलर म्हणजेच 4700 कोटी रुपये जमा करण्याची योजना आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 12:05 PM2021-03-20T12:05:05+5:302021-03-20T12:09:19+5:30

zomato likely to launch ipo in september here know the details : कंपनीची बाजारपेठेतून 650 मिलियन डॉलर म्हणजेच 4700 कोटी रुपये जमा करण्याची योजना आहे.

zomato likely to launch ipo in september here know the details | गुंतवणूकदारांना कमाई करण्याची मोठी संधी, लवकरच Zomato कंपनी आणणार IPO; वाचा सविस्तर

गुंतवणूकदारांना कमाई करण्याची मोठी संधी, लवकरच Zomato कंपनी आणणार IPO; वाचा सविस्तर

Highlightsगेल्या महिन्यात आयपीओपूर्वी झोमॅटोने सध्याच्या गुंतवणूकदारांकडून 250 दशलक्ष डॉलर्स किंवा 1,800 कोटी रुपयांचा नवीन निधी जमा केला.

नवी दिल्ली : फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो (Zomato) आता इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओच्या (IPO) माध्यमातून गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात पैसे कमवण्याची संधी देणार आहे. कंपनीची बाजारपेठेतून 650 मिलियन डॉलर म्हणजेच 4700 कोटी रुपये जमा करण्याची योजना आहे. यासाठी कंपनी सप्टेंबर 2021 च्या आधी आपला आयपीओ लाँच करणार आहे. (zomato likely to launch ipo in september here know the details)

एप्रिलपर्यंत फायलिंग प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनी एप्रिल 2021 मध्ये या आयपीओसाठी सेबीला बाजार नियामक सेबीकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस मसुदा सादर करू शकते. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, सप्टेंबर 2021 च्या अखेरपर्यंत कंपनीची शेअर बाजारात यादी करण्याची योजना आहे. कंपनी या संदर्भात चर्चा करीत आहे. आयपीओ साईज असेल? हे 4700 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल, हे अद्याप ठरले नाही. दरम्यान, कंपनीने आयपीओबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले नाही.

सिरिल अमरचंद मंगलदास आणि इंडस लॉ कायदेशीर सल्लागार
जानेवारी 2021 मध्ये कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झोमॅटोने कोटक महिंद्र कॅपिटलसमवेत गोल्डमॅन सॅक्स, मॉर्गन स्टेनली आणि क्रेडिट सुईस यांना गुंतवणूकीची अग्रणी बँक म्हणून नियुक्त आहे. या व्यतिरिक्त कंपनीने कायदेशीर सल्ला घेण्यासाठी कायदेशीर सल्लागार म्हणून सिरिल अमरचंद मंगलदास आणि इंडस लॉ यांना कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे.

(आता घरबसल्या मागवू शकता Street Food, सरकारनं Zomato सोबत केला करार )

जमा केला 1800 कोटी रुपयांचा नवीन निधी
गेल्या महिन्यात आयपीओपूर्वी झोमॅटोने सध्याच्या गुंतवणूकदारांकडून 250 दशलक्ष डॉलर्स किंवा 1,800 कोटी रुपयांचा नवीन निधी जमा केला. हे कंपनीच्या प्री-आयपीओ निधी म्हणून पाहिले जाते. यासह कंपनीचे मूल्यांकन आता 5.4 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 40,000 कोटी रुपयांवर गेले आहे, तर डिसेंबर 2020 मध्ये कंपनीचे मूल्यांकन फक्त 28,000 कोटी रुपये होते.

('या' कार्डद्वारे खरेदी केल्यास मिळेल 5 टक्के कॅशबॅक; जाणून घ्या, काय आहेत फीचर्स?)

Web Title: zomato likely to launch ipo in september here know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.