Join us

Zomato पुन्हा चर्चेत; आधी 16000000 रुपये पगाराची नोकरी देऊ केली, नंतर माघार घेतली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 5:48 PM

या नोकरीच्या ऑफरमुळे झोमॅटोची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

इंस्टट फूड डिलिव्हरी अॅप Zomato पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याचे कारण म्हणजे, झोमॅटोने कॉलेज कॅम्पसमध्ये देऊ केलेली उच्च पगाराची नोकरी आहे. IIT दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी दावा केला की, झोमॅटोने प्लेसमेंट हंगामात उच्च पगाराची नोकरी जाहीर केली होती, परंतु आता ती ऑफर मागे घेतली आहे. आयआयटी दिल्लीच्या प्लेसमेंट समितीने याबाबत माहिती दिली. 

या पदासाठी 16000000 रुपये पगारZomato ने अल्गोरिदम इंजिनीअर पदासाठी जागा भरणार असल्याचे जाहीर केले होते. या पदासाठी 1.6 कोटी रुपये पगार जाहीर करण्यात आला होता. ही नोकरी झोमॅटोची उपकंपनी असलेल्या Blinkit साठी होती. अनेक X युजर्स फ्रेशर्सना ऑफर केलेल्या प्रचंड पगाराबद्दल चकित झाले. मात्र, कंपनीने आता ही ऑफर मागे घेतली आहे.

IIT-Delhi मधील MSc चा विद्यार्थी हृतिक तलवार याने X वर याबाबत पोस्ट केली आहे. त्याने लिहिले की, झोमॅटोने 1.6 कोटी पगार देऊ केला होता. कंपनीला चांगला हाईप मिळाला, नंतर कंपनीने ही ऑफर मागे घेतली. विद्यार्थ्याने नोटिफिकेशनचा एक फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये कंपनीने मागे घेतलेल्या ऑफरबद्दल अपडेट देण्यात आले आहे. तसेच, या अधिसूचनेत विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. तलवारच्या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत. काहींनी याला कंपनीचा मार्केटिंग स्टंट म्हटले आहे, तर काहींनी टायपिंग एरर म्हटले आहे. 

टॅग्स :झोमॅटोव्यवसायनोकरीविद्यार्थीकर्मचारी