Blinkit Bistro : भारतात क्विक कॉमर्स (झटपट वाणिज्य) क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळेच आता अॅमेझॉनसारखे मोठे खेळाडूनही या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. मात्र, इथं तर आधीपासून मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. क्विक कॉमर्स अॅप ब्लिंकिटने १० मिनिटांच्या फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये एक नवीन पाऊल टाकले आहे. झोमॅटोच्या क्विक कॉमर्स उपकंपनी ब्लिंकिटने 'बिस्ट्रो'च्या रूपात एक नवीन प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे, जो १० मिनिटांत ग्राहकांना स्नॅक्स, जेवण आणि पेये वितरीत करेल. दुसरीकडे झोमॅटोची स्पर्धक Zepto ने गुरुवारी आपला फूड डिलिव्हरी उपक्रम Zepto Café लाँच करण्याची घोषणा केली होती. फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा असल्याचे यावरुन स्पष्ट होते.
बिस्ट्रो कुठून डाउनलोड करायचे?मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिस्ट्रो Google Play Store वरून डाउनलोड करता येईल. Apple App Store वर देखील लवकरच उपलब्ध होणार आहे. हे अॅप ६ डिसेंबर २०२४ रोजी लाँच करण्यात आले आहे. Blinkit's Bistro हे Zepto Cafe चे स्पर्धक मानले जात आहे. झटपट फूड आणि किराणा डिलिव्हरी विभागात प्रवेश करण्याचा झोमॅटोचा हा दुसरा प्रयत्न आहे. काही काळापूर्वी Zomato ने Zomato Instant लाँच केले होते, जे नंतर बंद कावे लागले.
बिस्ट्रो आणि झेप्टो कॅफे तयार खाद्यपदार्थ विकणारइन्स्टंट फूड डिलिव्हरी क्षेत्रात, स्विगीचेस्विगी बोल्ट आणि झेप्टोच्या झेप्टो कॅफे हे पुढचं पाऊल आहे. हे अॅप-आधारित फूड एग्रीगेटर संपूर्ण अन्न किंवा जेवण विकत नाहीत. परंतु, समोसे, सँडविच, कॉफी, पेस्ट्रीसारखे तयार खाद्य पदार्थ विकतात. ब्लिंकिटने हे विशेष फूड आधारित अॅप अशा वेळी लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे, जेव्हा या क्षेत्रात आणखी काही कंपन्या उतरण्याच्या तयारीत आहेत. याद्वारे ते अतिरिक्त किराणा आणि इतर वस्तूंपासून दूर राहून आणि १० मिनिटांत खाद्यपदार्थ पोहोचवून त्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.