Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'थर्टी फर्स्ट'च्या रात्री 'झोमॅटो'चा रेकॉर्ड; एका मिनिटामागे ४,१०० ऑडर्स!

'थर्टी फर्स्ट'च्या रात्री 'झोमॅटो'चा रेकॉर्ड; एका मिनिटामागे ४,१०० ऑडर्स!

झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दिपेंदर गोयल यांनी याबाबतची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवर ट्विट केली आहे.

By मोरेश्वर येरम | Published: January 1, 2021 03:49 PM2021-01-01T15:49:07+5:302021-01-01T16:02:34+5:30

झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दिपेंदर गोयल यांनी याबाबतची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवर ट्विट केली आहे.

zomato receives 4100 orders per minute on New Years eve its highest ever | 'थर्टी फर्स्ट'च्या रात्री 'झोमॅटो'चा रेकॉर्ड; एका मिनिटामागे ४,१०० ऑडर्स!

'थर्टी फर्स्ट'च्या रात्री 'झोमॅटो'चा रेकॉर्ड; एका मिनिटामागे ४,१०० ऑडर्स!

Highlights'थर्टी फर्स्ट'च्या रात्री 'झोमॅटो'ला तुफान प्रतिसाद'झोमॅटो'ने केला नवा विक्रम, एका मिनिटाला ४,१०० ऑडर्स कोविड नियमांमुळे यंदाची थर्टी फर्स्ट अनेकांनी घरातच करणं पसंत केलं

नवी दिल्ली
ऑनलाइन रेस्टॉरंट गाइड आणि फूड डिलिव्हिरी सेवा देणाऱ्या 'झोमॅटो'नेनववर्ष स्वागताला नवा विक्रम केला आहे. 'थर्टी फर्स्ट'च्या दिवशी 'झोमॅटो'ला दर एका मिनिटामागे तब्बल ४१०० ऑनलाइन फूड ऑडर्स मिळाल्या आहेत. 

झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दिपेंदर गोयल यांनी याबाबतची माहिती त्यांच्या ट्विटर हँडलवर ट्विट केली आहे. 'थर्टी फर्स्ट'च्या रात्री 'झोमॅटो'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादाने कंपनीच्या तांत्रिक टीमची झोप उडाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

गोयल यांनी ३१ डिसेंबर रोजी संध्या. ७ वा. ५३ मि. एक ट्विट केलं. "कंपनीच्या सिस्टममध्ये तुफान ऑडर्स आल्या आहेत. १ लाख १४ हजार लोकांनी आताच्या घडीला ऑडर्स केल्या आहेत. देशात विविध ठिकाणी सध्या २० हजार लोकांना सध्या बिर्याणीची ऑडर पोहोचविण्याचं काम सुरू आहे. तर १६ हजार लोकांना पिझ्झाची डिलिव्हरी सुरू आहे. यातील ४० टक्क्यांहून अधिक जणांनी एक्स्ट्रा चीझ पिझ्झा ऑर्डर केलाय", अशी माहिती गोयल यांनी ट्विटमध्ये दिली होती. 

भारताबाहेरुन विशेषत: यूएई, लेबनॉन, तुर्की येथूनही भारतातील त्यांच्या नातेवाईकांसाठी ऑर्डर केली गेल्याचंही गोयल यांनी म्हटलंय. 

'झोमॅटो'च्या आजवरच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणात सेवा देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचंही ते म्हणाले. ३१ डिसेंबरला सायं. ६ वाजून १४ मिनिटांना २,५०० ऑडर्स ते रात्री ८ वाजून २२ मिनिटांना दर मिनिटामागे ४,१०० ऑडर्स आल्यांचं गोयल यांनी सांगितलंय. 'झोमॅटो'चा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. 

कोविड-१९ मुळे देशात ठिकठिकाणी विविध निर्बंध लागू आहेत. महाराष्ट्रात महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ नंतर संचारबंदी आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स ११ वाजताच बंद झाले. त्यात अनेकांनी यावेली घरीच राहून नववर्षाचं स्वागत करणं पसंत केलं. यात मुंबई महानगरपालिकेने थर्टी फर्स्टसाठी ऑनलाईन फूड ऑडर्ससाठी रात्री ११ नंतरही परवानगी दिली होती. त्यामुळे ऑनलाइन फूड डिलिव्हरी वेबसाइट्सना याचा मोठा फायदा झाल्याचं म्हटलं जात आहे. 
 

Web Title: zomato receives 4100 orders per minute on New Years eve its highest ever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.