Lokmat Money > बिझनेस न्यूज > Zomato ची मोठी घोषणा, फूड डिलिव्हरी कंपनी नाही करणार 'हा' व्यवसाय; मागे घेतला निर्णय

Zomato ची मोठी घोषणा, फूड डिलिव्हरी कंपनी नाही करणार 'हा' व्यवसाय; मागे घेतला निर्णय

Zomato News : झोमॅटोनं एक मोठी घोषणा केली आहे. झोमॅटोनं मंगळवारी शेअर बाजाराला यासंदर्भातील माहितीदेखील दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 09:23 AM2024-07-03T09:23:21+5:302024-07-03T09:24:14+5:30

Zomato News : झोमॅटोनं एक मोठी घोषणा केली आहे. झोमॅटोनं मंगळवारी शेअर बाजाराला यासंदर्भातील माहितीदेखील दिली आहे.

Zomato s big announcement the food delivery company will not do loan and credit business informed share marekt rbi | Zomato ची मोठी घोषणा, फूड डिलिव्हरी कंपनी नाही करणार 'हा' व्यवसाय; मागे घेतला निर्णय

Zomato ची मोठी घोषणा, फूड डिलिव्हरी कंपनी नाही करणार 'हा' व्यवसाय; मागे घेतला निर्णय

Zomato News : झोमॅटोनं एक मोठी घोषणा केली आहे. फूड डिलिव्हरी कंपनीनं यापुढे लोन किंवा क्रेडिट व्यवसाय करणार नसल्याचं म्हटलं आहे. झोमॅटोच्या शेअरहोल्डर्ससाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. झोमॅटोनं मंगळवारी शेअर बाजाराला यासंदर्भातील माहिती दिली. एप्रिल २०२२ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (RBI) केलेला अर्ज मागे घेण्यात आला असल्याचं कंपनीनं म्हटलं. झोमॅटोनं आरबीआयकडे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीचा (NBFC) परवाना मागितला होता.

दीपिंदर गोयल यांची कंपनी झोमॅटोनं ऑगस्ट २०२१ मध्ये झोमॅटो पेमेंट प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. पेमेंट अॅग्रीगेटर (PA) परवाना मिळविणं हा त्यामागचा उद्देश होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये झोमॅटो फायनान्शियल सर्व्हिसेसदेखील तयार करण्यात आली. मात्र, कंपनीला एनबीएफसीचा परवाना मिळू शकला नाही.

कामकाजावर परिणाम होणार नाही

या निर्णयाचा कंपनीच्या महसुलावर किंवा कामकाजावर कोणताही विशेष परिणाम होणार नाही, असं झोमॅटोनं म्हटलंय. कंपनीनं स्वत:हून ही माहिती सार्वजनिक केल्याचंही सांगण्यात आलंय. गेल्या महिन्यात अशीही माहिती समोर आली होती की, झोमॅटो पेटीएमचा मुव्ही आणि तिकीट बुकिंग व्यवसाय विकत घेण्यासाठी बोलणी करत आहे. याबाबत पेटीएमशी चर्चा सुरू असल्याची कबुली झोमॅटोनं दिली होती. परंतु, अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.

Web Title: Zomato s big announcement the food delivery company will not do loan and credit business informed share marekt rbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.