Zomato Deepinder Goyal : झोमॅटोचे मालक दीपिंदर गोयल सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. अधूनमधून ते अशा पोस्टही टाकतात ज्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. कधी तो स्वत: फूड डिलिव्हरीसाठीही बाहेर पडतात, तर कधी नवनवीन गोष्टी समोर आणून लोकांना आश्चर्यचकित करतात. आता त्यांनी वेकन्सीशी संबंधित एक पोस्ट केली आहे जी बरीच व्हायरल झाली आहे.
दीपिंदर ने या नोकरीसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लोकांकडून अर्ज मागवले आहेत. त्यात त्यांनी 'दोन मेंदू' असलेल्या व्यक्तीच्या शोधात असल्याचं लिहिलं होतं. इथे दुसऱ्या मेंदूचा अर्थ म्हणजे त्या व्यक्तीच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचं ज्ञान.
पोस्ट झाली व्हायरल
दीपिंदर यांनी मंगळवारी सकाळी यासंदर्भातील पोस्ट केली. बघता बघता ती व्हायरल झाला. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही पोस्ट १.२२ लाखांहून अधिक लोकांनी वाचली आहे. तर ३०० हून अधिक युजर्सनी कमेंटही केल्या होत्या. १.५० हजारांहून अधिक लाईक्स आणि ६० हून अधिक रिपोस्ट पोस्ट करण्यात आली होती.
काय म्हटलंय पोस्टमध्ये?
"मला त्या बिझनेस आणि प्रोडक्ट लीडर्ससोबत काम करायचं, ज्यांनी पहिल्यापासूनच एआयच्या आपल्या दुसऱ्या डोक्याच्या रुपात काम करणं सुरू केलंय," असं दीपिंदर यांनी नमूद केलंय. यासोबत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये एक ईमेल आयडीही दिला आहे, ज्याद्वारे त्यांना संपर्क करता येऊ शकतो. सोबतच सब्जेक्ट लाईनमध्ये "I have a second brain", असं लिहिण्यासही त्यांनी सांगितलंय.