Join us

Zomatoचा डिलिव्हरी बॉय बनला सरकारी अधिकारी, लोकसेवा परीक्षेत मिळालं यश; कंपनीनं म्हटलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 11:37 AM

मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य गोष्टही शक्य करता येऊ शकते. सध्या झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे.

मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्य गोष्टही शक्य करता येऊ शकते. सध्या झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो व्हायरल होत आहे. त्यानं तामिळनाडू लोकसेवा परीक्षेत मोठं यश मिळवलंय. झोमॅटोनंही त्याचा फोटो शेअर करत त्याच्या मेहनतीचं आणि यशाचं कौतुक केलंय. त्या झोमॅटो बॉयचं नाव विग्नेश असं आहे. तो तामिळनाडूचा रहिवासी आहे.

झोमॅटोनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विग्नेशची कहाणी सर्वांसोबत शेअर केलीये. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असलेल्या एका व्यक्तीनं राज्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या परीक्षेत यश मिळवत अधिकाऱ्याचं पद मिळवलं असल्याचं झोमॅटोनं म्हटलंय. झोमॅटोनं त्यानं कहाणी शेअर केलीये. 'विग्नेशसाठी एक लाईक तर बनतेच. त्यानं डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करताना तामिळनाडू लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलंय,' असं झोमॅटोनं म्हटलंय. 

सोशल मीडियावर विग्नेशची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विग्नेशच्या या यशानं अनेकांना प्रभावित केलंय. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही त्याचं अभिनंदन केलंय. झोमॅटोच्या या पोस्टवर हजारो लोकांनी लाईक आणि कमेंट केलंय. अनेकांनी विग्नेशचं अभिनंदनही केलं.

टॅग्स :झोमॅटोतामिळनाडू