ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोच्या (Zomato) गुंतवणूकदारांना या आठवड्यात मोठा तोटा सहन करावा लागला आहे. गेल्या शुक्रवारी, कंपनीच्या संचालक मंडळाने ब्लिंकिटच्या अधिग्रहणास मान्यता दिली. तेव्हापासून झोमॅटोचा स्टॉक २५ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. यादरम्यान कंपनीचे बाजार भांडवलही सुमारे १२,००० कोटी रुपयांनी कमी झाले आहे.
बीएसई निर्देशांकावर झोमॅटोच्या शेअरची किंमत जवळपास ४ टक्क्यांनी घसरून ५५ रुपयांच्या पातळीवर आली आहे. त्याच वेळी, बाजार भांडवल देखील ४३,६६० कोटी रुपये झाले आहे. दरम्यान, Zomato स्टॉकची ऑल टाईम लो लेव्हल ५०.३५ रुपये आहे. ११ मे रोजी झोमॅटोने ही पातळी गाठली.
२०२१ मध्ये आला होता आयपीओगेल्या वर्षी झोमॅटोचा आयपीओ लाँच झाला होता. कंपनीनं यासाठी इश्यू प्राईज ७६ रूपये ठेवली होती. सध्या या शेअरची किंमत त्याच्या मूळ किंमतीपेक्षा २८ टक्क्यांनी घसरली आहे. या शेअरनं नोव्हेंबर २०२१ मध्ये १६९.१० रुपयांच्या ५३ आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला होता.
ब्लिंकिट डीलचा परिणामझोमॅटोचे शेअर्स सातत्यानं घसरत आहेत. दरम्यान, ब्लिंकिट डीलनं झोमॅटोच्या नफ्याच्या मार्गाला नुकसान पोहोचवलं असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. झोमॅटोनं ५६८.१६ मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ४४४७ कोटी रूपयांना ब्लिकिंटचं अधिग्रहण केलं आहे.