Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रतिस्पर्धी असलेल्या Swiggy साठी झोमॅटोची मन जिंकणारी पोस्ट; सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

प्रतिस्पर्धी असलेल्या Swiggy साठी झोमॅटोची मन जिंकणारी पोस्ट; सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

Zomato-Swiggy: ऑनलाईन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आपला प्रतिस्पर्धी स्विगीचे झोमॅटोने जोरदार स्वागत केलं आहे. एक्स वर पोस्ट लिहित झोमॅटोने सर्वांची मने जिंकली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 12:43 PM2024-11-13T12:43:58+5:302024-11-13T12:45:17+5:30

Zomato-Swiggy: ऑनलाईन फूड डिलिव्हरी क्षेत्रातील आपला प्रतिस्पर्धी स्विगीचे झोमॅटोने जोरदार स्वागत केलं आहे. एक्स वर पोस्ट लिहित झोमॅटोने सर्वांची मने जिंकली आहे.

zomato welcome swiggy listing on stock market posted heart touching picture and caption for it | प्रतिस्पर्धी असलेल्या Swiggy साठी झोमॅटोची मन जिंकणारी पोस्ट; सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

प्रतिस्पर्धी असलेल्या Swiggy साठी झोमॅटोची मन जिंकणारी पोस्ट; सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

Zomato-Swiggy : अपवाद वगळता प्रत्येकाला आपला स्पर्धक मागे राहावा असं वाटतं असतं. व्यावसायिक क्षेत्रात तर ही रस्सीखेच उघडपणे पाहायला मिळते. अशा परीस्थितीत एका व्यावसायिक कंपनीने उघडपणे आपल्या स्पर्धक कंपनीचे स्वागत केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी आणि क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म स्विगी आज शेअर बाजारात ८ टक्क्यांवर लिस्ट झाली आहे. यामुळे देशातील ऑनलाइन फूड डिलिव्हरीचे दोन प्रमुख प्लॅटफॉर्मची भारतीय शेअर बाजारात आले आहेत. आधीच लिस्टेड असलेली झोमॅटोचीस्विगी प्रतिस्पर्धी आहे. पण, झोमॅटोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

झोमॅटोची X वर मन जिंकणारी पोस्ट
झोमॅटोने X वर स्विगी आणि झोमॅटो शर्ट घातलेल्या दोन डिलिव्हरी बॉईजचा फोटो पोस्ट केला आहे. खांद्यावर हात असलेल्या हे डिलिव्हरी बॉय बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इमारतीसमोर उभे आहेत. यावेळी इमारतीच्या डिजिटल पॅनलवर Now Listed : Swiggy असं लिहिले आहे. या पोस्टला मन जिंकणारे कॅप्शन लिहिलं आहे. You and I... In this beautiful world ❤️ @Swiggy

स्विगीनेही दिली प्रतिक्रिया
'या सुंदर जगात तू आणि मी' असा या ओळीचा अर्थ आहे. ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून लाखो युजर्स या पोस्टला लाईक्स आणि शेअर केलं आहे. स्विगीनेही झोमॅटोच्या स्वागताचा खुलेपणाने स्वीकार केला आहे. स्विगीने देखील झोमॅटोच्या शैलीतच यावर प्रतिक्रिया दिली आहे. हे जय आणि वीरू असल्याची कमेंट स्वीगीने झोमॅटोच्या पोस्टवर केली आहे. शोले चित्रपटातील जय आणि वीरूच्या जोडीप्रमाणेच स्विगी आणि झोमॅटोची जोडी लोकांना आवडेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.

स्विगीची लिस्टींग कशी होती?
आज स्विगीच्या लिस्टींगमध्ये शेअर्स NSE वर ८ टक्के लिस्टिंगसह ४२० रुपयांवर लिस्ट झाले. बीएसईवर लिस्टींग पाहिली तर, प्रति शेअर ४१२ रुपये दराने लिस्टींग झाली होती. येथे ४४४ रुपये इतकी उच्च किंमतीवर पोहचली होती.

झोमॅटोची लिस्टींग कशी होती?
झोमॅटोची २३ जुलै २०२१ रोजी शेअर बाजारात लिस्टिंग झाली होती. ७६ रुपयांच्या IPO किमतीपेक्षा ५३ टक्के प्रीमियमसह शेअर ११६ रुपयांवर लिस्ट झाला होता. त्याच दिवशी शेअर ८० टक्क्यांच्या उसळीसह १३८ रुपयांवर गेला होता.

Web Title: zomato welcome swiggy listing on stock market posted heart touching picture and caption for it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.