Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोनाकाळात ‘झूम’ने किती पैसे कमावले?; आकडा पाहून डोळे विस्फारतील

कोरोनाकाळात ‘झूम’ने किती पैसे कमावले?; आकडा पाहून डोळे विस्फारतील

कोरोनाच्या कृपेने ‘झूम’ची बख्खळ कमाई   

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 05:28 AM2021-06-05T05:28:25+5:302021-06-05T05:28:46+5:30

कोरोनाच्या कृपेने ‘झूम’ची बख्खळ कमाई   

zoom earns 2 65 billion dollars revenue in financial year ended on january 2021 | कोरोनाकाळात ‘झूम’ने किती पैसे कमावले?; आकडा पाहून डोळे विस्फारतील

कोरोनाकाळात ‘झूम’ने किती पैसे कमावले?; आकडा पाहून डोळे विस्फारतील

अख्ख्या जगाला आर्थिक संकटाच्या खाईत लोटणाऱ्या कोरोनाच्या महामारीने काही विशिष्ट उद्योगांना मात्र जबरदस्त हात दिला. त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल, अशा गतीने त्यांच्या कमाईचे आलेख वरवर चढत अगदी आकाशाला भिडले! त्यातला एका मजबूत लाभार्थी म्हणजेच झूम! घरात कोंडल्या गेलेल्या जगाला सगळीकडेच व्हर्चुअल साधने वापरावी लागली, त्यातही सर्वाधिक वापर झाला तो झूम या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मिटिंग ॲपचा! ‘‘यापुढे कामाची ‘प्लेस’ नसेलच,  झूमची ‘स्पेस’ हेच जगाचं ऑफिस असेल’’, असं सांगत झूमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक युआन यांनी २०२१ च्या जानेवारीत संपलेल्या कंपनीच्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल २.६५ बिलियन  डॉलर्सवर पोहोचल्याचं जाहीर केलं. यातले ६३१ मिलियन डॉलर्स हा कंपनीचा निव्वळ नफा आहे. जूनच्या प्रारंभी झूमचं बाजारमूल्य तब्बल ९६ बिलियन डॉलर्सवर पोचलं आहे. गेल्यावर्षी हे बाजारमूल्य ४० बिलियन डॉलर्स होतं, म्हणजे आता करा हिशेब !!

Web Title: zoom earns 2 65 billion dollars revenue in financial year ended on january 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.