Lokmat Money > बिझनेस न्यूज > १ एप्रिलपासून एकच केवायसी

१ एप्रिलपासून एकच केवायसी

विविध आस्थापनांतून वेगवेगळी केवायसी (नो युअर कस्टमर) करण्याची जंजाळ प्रणाली संपुष्टात येत सर्व वित्तीय व्यवहारांत एकच केवायसी प्रणाली

By admin | Published: February 23, 2016 01:50 AM2016-02-23T01:50:36+5:302016-02-23T01:50:36+5:30

विविध आस्थापनांतून वेगवेगळी केवायसी (नो युअर कस्टमर) करण्याची जंजाळ प्रणाली संपुष्टात येत सर्व वित्तीय व्यवहारांत एकच केवायसी प्रणाली

One KYC from April 1st | १ एप्रिलपासून एकच केवायसी

१ एप्रिलपासून एकच केवायसी

मुंबई : विविध आस्थापनांतून वेगवेगळी केवायसी (नो युअर कस्टमर) करण्याची जंजाळ प्रणाली संपुष्टात येत सर्व वित्तीय व्यवहारांत एकच केवायसी प्रणाली
अंमलात आल्यानंतर आता याचा पुढचा टप्पा गाठला जाणार आहे. या अंतर्गत देशपातळीवर एकच केवायसी प्रणाली ग्राह्य धरली जाणार असून याची सुरुवात १ एप्रिल २०१६ पासून सुरू होणार आहे.
केवायसी प्रणाली अस्तित्वात आल्यानंतर विमा, म्युच्युअल फंड, बँकां, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अशा विविध ठिकाणी वेगवेगळी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागत असे. मात्र, दीड वर्षांपूर्वी यामध्ये बदल करत एकेठिकाणी केलेली केवायसी सर्वत्र गाह्य धरण्याचा निर्णय झाला. आता आधार कार्ड प्रणाली देशात अस्तित्वात आल्यानंतर देशपातळीवर एकच केवायसी प्रणाली विकसित करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (प्रतिनिधी)

देशपातळीवर एकच केवायसी प्रणाली लागू झाली तर देशाच्या कोणत्याही भागातून कोणतेही वित्तीय व्यवहार करणे शक्य होणार आहे. याची अंमलबजावणी येत्या एक एप्रिलपासून होण्याचे संकेत मिळत आहेत.

या निर्णयामुळे नागरिकांची केवायसीच्या किचकट कटकटीतून सुटका होणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक वेळी केवायसीची पूर्तता करण्याची गरज त्यामुळे राहणार नाही.

Web Title: One KYC from April 1st

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.