Lokmat Money > बिझनेस न्यूज > Paras Defence And Space Technologies : एका दिवसात २० टक्क्यांचे रिटर्न; 'या' स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीचे शेअर्स का बनलेत रॉकेट?

Paras Defence And Space Technologies : एका दिवसात २० टक्क्यांचे रिटर्न; 'या' स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीचे शेअर्स का बनलेत रॉकेट?

Paras Defence And Space Technologies : गेल्या काही दिवसांपासून संरक्षण क्षेत्राशी निगडीत कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येताना दिसत आहे. ४५१० कोटी रुपयांचं मार्केट कॅप असलेल्या या कंपनीचा शेअर शुक्रवारी २० टक्क्यांनी वधारून १,१५७ रुपयांवर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 04:16 PM2024-06-18T16:16:39+5:302024-06-18T16:16:53+5:30

Paras Defence And Space Technologies : गेल्या काही दिवसांपासून संरक्षण क्षेत्राशी निगडीत कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येताना दिसत आहे. ४५१० कोटी रुपयांचं मार्केट कॅप असलेल्या या कंपनीचा शेअर शुक्रवारी २० टक्क्यांनी वधारून १,१५७ रुपयांवर पोहोचला.

Paras Defense And Space Technologies 20 percent returns in one day Why have the shares of smallcap defense company become a rocket | Paras Defence And Space Technologies : एका दिवसात २० टक्क्यांचे रिटर्न; 'या' स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीचे शेअर्स का बनलेत रॉकेट?

Paras Defence And Space Technologies : एका दिवसात २० टक्क्यांचे रिटर्न; 'या' स्मॉलकॅप डिफेन्स कंपनीचे शेअर्स का बनलेत रॉकेट?

गेल्या काही दिवसांपासून संरक्षण क्षेत्राशी निगडीत कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येताना दिसत आहे. ४५१० कोटी रुपयांचं मार्केट कॅप असलेल्या पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजचा शेअर शुक्रवारी २० टक्क्यांनी वधारून १,१५७ रुपयांवर पोहोचला. पारस डिफेन्सच्या शेअरने शुक्रवारी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांची वाढ होऊन तो १३८८.२५ रुपयांवर पोहोचला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ५ वर्षात संरक्षण निर्यात ५०००० कोटींपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यानंतर देशातील सर्व संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर वाढ झाली आहे.
 

५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर
 

कंपनीच्या शेअरनं मंगळवारी ५२ आठवड्यांचा १३८८.२५ रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला. तर पारस डिफेन्सच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५५० रुपये आहे. त्यानुसार ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून पारस डिफेन्सच्या समभागांनी गुंतवणूकदारांचं भांडवल दुप्पट केलं आहे. पारस डिफेन्सच्या शेअरनं गेल्या 5 दिवसांत गुंतवणूकदारांना ८९९ रुपयांच्या नीचांकी पातळीवरून ५४ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे आणि गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअरनं ९७ टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय.
 

स्पेस टेकचं आहे कामकाज
 

पारस डिफेन्सचा शेअर हा लवकरच बंपर परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी ही डिफेन्स अँड स्पेस इंजिनिअरिंग, प्रोडक्ट्स अँड सोल्यूशन्स डिझाइन, डेव्हलपिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि चाचणीमध्ये गुंतलेली खाजगी क्षेत्रातील कंपनी आहे.
 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Paras Defense And Space Technologies 20 percent returns in one day Why have the shares of smallcap defense company become a rocket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.