नवी दिल्ली : भारतात बचतीसाठी सर्वात लोकप्रिय गुंतवणुकीचे साधन म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposits). गेल्या काही दिवसांत एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक यासह अनेक बँकांचे एफडी दरांमध्ये मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm Payments Bank) मध्ये एफडी करणे फायद्याचे ठरू शकते. कारण, पेटीएम पेमेंट्स बँक 7 टक्के व्याज दराने एफडीची सुविधा देत आहे.
इंडसइंड बँकेसोबत पार्टनरशीप
पेमेंट्स बँकेला एफडीची सुविधा प्रदान करण्याची प्रत्यक्षरित्या परवानगी नाही आहे. त्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकेने यासाठी इंडसइंड बँकेशी पार्टनरशीप केली आहे. दरम्यान, व्याजदर इंडसइंड बँकेकडून निश्चित केले जातात.
फक्त 13 महिन्यांचा मॅच्युरिटी पीरियड
पेटीएम पेमेंट बँकेच्या एफडीमध्ये मॅच्युरिटी पीरियड 13 महिन्यांचा आहे. यावर 7 टक्के व्याज मिळते. या एफडीमधील विशेष बाब म्हणजे मॅच्युरिटी पीरिएडआधी जरी एफडी तोडली तरी कोणताही चार्ज द्यावा लागत नाही. मात्र, ही 7 दिवसांपूर्वी तोडल्यास तुम्हाला व्याज मिळणार नाही.
इतर बँकांचे एफडीवरील व्याजदर
- एयू स्मॉल फायनान्स बँकेत तुम्हाला एफडीवर 7 टक्के दराने व्याज मिळेल.
- डीसीबी बँकेत 6.95 टक्के दराने व्याज मिळत आहे. या बँकेत 1.5 लाख रुपयाची गुंतवणूक 5 वर्षात 2,11,696 रुपये होईल.
- आयडीएफसी बँकेत 5 वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के दराने व्याज मिळत आहे. या बँकेत 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक 5 वर्षानंतर 2,09,625 रुपये होईल.
- येस बँकेत एफडीवरील व्याजदर 6.25 टक्के आहे.
- Deutsche Bank आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 5 वर्षांच्या एफडीवर 6.25 टक्के दराने व्याज देत आहे. 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षांनी ही रक्कम वाढून 2,02,028 रुपये होईल.
- बंधन बँक आणि करूर वैश्य बँक 5 वर्षांच्या एफडीवर 6 टक्के व्याज देत आहे.