Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ; जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर!

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ; जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर!

Petrol Price Today : इंधनाच्या दरात वाढ झाल्यानंतर राजधानीत पेट्रोल आज प्रतिलिटर 96.41 रुपये तर डिझेल 87.28 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 09:22 AM2021-06-14T09:22:26+5:302021-06-14T09:23:19+5:30

Petrol Price Today : इंधनाच्या दरात वाढ झाल्यानंतर राजधानीत पेट्रोल आज प्रतिलिटर 96.41 रुपये तर डिझेल 87.28 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे.

petrol and diesel price hike today on 14 june 2021 check latest rates | Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ; जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर!

Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ; जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर!

नवी दिल्ली: एका दिवसाच्या आरामानंतर सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात 29 पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात 30 पैशांची वाढ झाली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची वाढती मागणी वाढल्यामुळे त्याचे दरही उडी घेताना दिसत आहेत. 

इंधनाच्या दरात वाढ झाल्यानंतर राजधानीत पेट्रोल आज प्रतिलिटर 96.41 रुपये तर डिझेल 87.28 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. 4 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यापासून किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. आतापर्यंत 25 दिवसांत 6.09 प्रति लिटर रुपयांनी महाग झाले आहे. त्याचबरोबर, 25 दिवसांत डिझेल प्रति लिटर 6.30 रुपयांनी महाग झाले आहे.

शहरांमध्ये 1 लीटर पेट्रोल-डिझेलचे दर
इंडियन ऑईलच्या (Indian Oil) वेबसाइटनुसार राजधानी दिल्लीत आज एक लिटर पेट्रोलची किंमत (Petrol Price today in Delhi) 96.41 रुपये आहे तर डिझेलची किंमत  87.28 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल (Petrol price in Mumbai) 102.58  रुपये आणि डिझेल 94.70  रुपये, कोलकातामध्ये पेट्रोल 96.34 रुपये आणि डिझेल 90.12 रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 97.69 रुपये आणि डिझेल 91.92 रुपये आहे.

या शहरांमध्ये 100 रुपयांपुढे पोहोचला दर
हैदराबाद, मुंबई, जयपूर, भोपाळ, श्रीगंगा नगर आणि रीवा अशा अनेक शहरांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. येथे पेट्रोलची किंमत 3 डिजिटपर्यंत पोहोचली आहे.

दररोज सहा वाजता बदलतात किंमती
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज होणारा बदल सकाळी 6 वाजता होतो. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत याच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

अशाप्रकारे जाणून घ्या, पेट्रोल-डिझेलचे नवे दर....
देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. तसेच, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. याशिवाय, पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही मोबाइल फोनवर SMS द्वारे तपासू शकता. यासाठी तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल.

Web Title: petrol and diesel price hike today on 14 june 2021 check latest rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.