Lokmat Money > बिझनेस न्यूज > Petrol Diesel Price: गेले सलग २२ दिवस पेट्रोल आणि डिझेल दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price: गेले सलग २२ दिवस पेट्रोल आणि डिझेल दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 09:38 AM2021-08-08T09:38:03+5:302021-08-08T09:47:16+5:30

Petrol Diesel Price: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे पाहायला मिळत आहे.

petrol diesel price unchanged from last 22 days and know latest fuel rates in india | Petrol Diesel Price: गेले सलग २२ दिवस पेट्रोल आणि डिझेल दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर

Petrol Diesel Price: गेले सलग २२ दिवस पेट्रोल आणि डिझेल दर ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर

मुंबई: गेले दोन महिने सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे सामान्य जनता अगदी त्रस्त झाली होती. इंधनदरवाढीमुळे महागाईचाही भडका उडाल्याचे पाहायला मिळत होते. भाजीपाला, दूधही महागले. मात्र, विशेष बाब म्हणजे गेले सलग २२ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. एकीकडे जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव कमी होत असला तरी पेट्रोलियम कंपन्या इंधन दर कपात नसल्याचे सांगितले जात आहे. (petrol diesel price unchanged from last 22 days and know latest fuel rates in india)

मोठी घसरण! सोने तब्बल १ हजार अन् चांदी २ हजार रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

जागतिक कमॉडिटी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव ०.९१ टक्क्यांनी कमी होऊन ७०.६४ डॉलर झाला. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.३३ टक्के घसरला आणि तो ६८.१७ डॉलर प्रती बॅरल झाला. अमेरिकेत कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने धुमाकूळ घातला असून, डेल्टाचे रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा एकदा लॉकडाउनची शक्यता गडद बनली आहे. देशात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली नसल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी १७ जुलै २०२१ रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. 

अरे देवा! Vi मुळे ‘या’ तीन बँकांची चिंता वाढली; कंपनी बुडल्यास बसणार मोठा फटका

भोपाळमध्ये पेट्रोलचा सर्वाधिक दर

मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर १०७.८३ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव ११०.२० रुपयांवर कायम आहे. बंगळुरात पेट्रोल १०५.२५ रुपये झाले आहे.

Vi मधील माझा हिस्सा सरकारने घ्यावा; बिर्लांच्या प्रस्तावावर BJP खासदाराची सूचक प्रतिक्रिया

डिझेलचा सर्वाधिक दर कुठे?

मुंबईत डिझेलचा दर ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटरवर कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९८.६७ रुपये झाला आहे. तर, बंगळुरात डिझेल ९५.२६ रुपये आहे.

Adani Group चा आता महाराष्ट्र, छत्तीसगडमधील खाणींवर ताबा; लिलावात सर्वाधिक बोली!

दरम्यान, देशभरात पेट्रोल आणि डिझलचे दर सार्वकालिक उच्चांकावर आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही १०० रुपये प्रति लीटरपर्यंत गेली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश असून, भोपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा सर्वाधिक दर असल्याचे पाहायला मिळत आहे.
 

Web Title: petrol diesel price unchanged from last 22 days and know latest fuel rates in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.