मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेललाजीएसटीमध्ये आणण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. सर्व राज्यांनी विरोध केल्यामुळे सदर निर्णय घेण्यात आला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १४ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी ५ सप्टेंबर २०२१ रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी १५ पैसे कपात केली होती. (petrol diesel prices remain unchanged last 14 days know the today latest fuel rate in india)
भन्नाट! ड्रोन क्षेत्रात मिळतील १० हजार नोकऱ्या; ३ वर्षांत ९०० कोटींची उलाढाल अपेक्षित
जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. आठवड्याभरात कच्च्या तेलाचा भाव ३.३१ टक्क्याने वधारला आहे. अमेरिकेत शुक्रवारी बाजार बंद होताना ब्रेंट क्रूडचा भाव ७५.३४ डॉलर प्रती बॅरलवर स्थिरावला. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ७१.९७ डॉलरवर बंद झाला. गेल्या महिन्यात १८ ते २० ऑगस्ट असे तीन सलग दिवस डिझेल दरात २० पैसे कपात केली होती. त्यानंतर रक्षाबंधनाच्या दिवशी डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर एकदा डिझेलमध्ये १५ पैसे आणि गेल्या बुधवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी १५ पैसे कपात करण्यात आली होती.
Tata Safari गोल्ड एडिशन लॉंच; IPL मध्ये प्रत्येक Six वर देणार २ लाखांची मदत
देशात सर्वाधिक पेट्रोल दर कुठे?
मुंबईत रविवारी एक लीटर पेट्रोलचा दर १०७.२६ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.१९ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर ९८.९६ रुपये इतका आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०१.६२ रुपये झाले आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०९.६३ रुपये असून, बंगळुरूमध्ये पेट्रोलचा दर १०४.७० रुपये आहे.
Tata आणतेय स्वस्त CNG कार; केवळ ५ हजार रुपयांत बुकिंगला सुरुवात, पाहा
डिझेलचा दर किती?
मुंबईत रविवारी एक लीटर डिझेलचा दर ९६.१९ रुपये असून, दिल्लीत डिझेल ८८.६२ रुपये झाले आहे. चेन्नईत ९३.२६ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा दर ९१.७१ रुपये प्रती लीटर इतका आहे. भोपाळमध्ये डिझेलचा दर सर्वाधिक म्हणजे ९७.४३ रुपये असून, बंगळुरूमध्ये डिझेलचा दर ९४.०४ रुपये आहे.
सुखवार्ता नाहीच... पेट्रोल, डिझेल राहणार ‘जीएसटी’ कक्षेबाहेरच; सर्व राज्यांचा विरोध
दरम्यान, देशभरात पेट्रोल आणि डिझलचे दर सार्वकालिक उच्चांकावर असून, देशात भोपाळमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर देशात सर्वाधिक आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही १०० रुपये प्रति लीटरपर्यंत गेली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे.