Lokmat Money > बिझनेस न्यूज > फार्मा क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; ‘या’ ५ कंपन्यांचे ७ हजार कोटींचे IPO येणार

फार्मा क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; ‘या’ ५ कंपन्यांचे ७ हजार कोटींचे IPO येणार

आता फार्मा क्षेत्रातील ५ कंपन्या IPO आणण्याच्या विचारात असून, गुंतवणूकदारांसाठी ही उत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 06:08 PM2021-05-28T18:08:26+5:302021-05-28T18:10:45+5:30

आता फार्मा क्षेत्रातील ५ कंपन्या IPO आणण्याच्या विचारात असून, गुंतवणूकदारांसाठी ही उत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे.

pharmaceutical companies to prepare raised 7 thousand crore through ipo | फार्मा क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; ‘या’ ५ कंपन्यांचे ७ हजार कोटींचे IPO येणार

फार्मा क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी; ‘या’ ५ कंपन्यांचे ७ हजार कोटींचे IPO येणार

Highlightsफार्मा क्षेत्रात गुंतवणुकीची उत्तम संधी‘या’ ५ कंपन्यांचे ७ हजार कोटींचे IPO येणार

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर किंचितसा ओसरताना पाहायला मिळत असून, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवीन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घसरण होताना दिसत असली, तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि ब्लॅक फंगर आजाराचा वाढता फैलाव यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. यातच आता फार्मा क्षेत्रातील ५ कंपन्या IPO आणण्याच्या विचारात असून, गुंतवणूकदारांसाठी ही उत्तम संधी असल्याचे सांगितले जात आहे. (pharmaceutical companies to prepare raised 7 thousand crore through ipo)

मिळालेल्या माहितीनुसार, ग्लेनमार्क लाइफसायन्सेज, औषध उत्पादक कंपनी सुप्रिया लाइफसायन्सेज, विंडलास बायोटेक, एमक्योर फार्मा आणि वीडा क्लिनिकल रिसर्च या पाच कंपन्या सुरुवातीला आपला IPO आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. या माध्यमातून या पाच कंपन्या तब्बल ७ हजार कोटी रुपये जमा करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले जात आहे. 

IPO च्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट कामगिरी

इंव्हेस्टमेंट बँकरनुसार, फार्मा क्षेत्रातील या पाच कंपन्या शेअर बाजारात आयपीओ सादर करून ७ हजार कोटी रुपये जमवण्यासाठी तयारी करत आहेत. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात आयपीओच्या माध्यमातून कंपन्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली असून, शेअर बाजाराच्या विक्रमी घौडदौडीत फार्मा क्षेत्राचे योगदान मोठे असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षभरात फार्मा क्षेत्रातील कंपन्यांनी उत्तम कामगिरी केल्याचे बोलले जात आहे. 

तब्बल ५०१ टक्के परतावा

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात आरती फार्मा कंपनीच्या शेअर्समध्ये ५०१ टक्के परतावा मिळाला आहे. तर ग्रानुएल्स कंपनीच्या शेअरमध्ये २०१ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच जे अँड बी चेम या कंपनीचे शेअर्स १४५ टक्क्यांनी वाढले आहेत. याशिवाय ऑरबिंदो फार्मा कंपनीकडून दुप्पट परतावा मिळाला आहे. डिवी कंपनीचे शेअर्स १०४ टक्क्यांनी वधारले आहेत. इप्का लॅब्समध्ये ९७ टक्के आणि अजिंठा फार्माच्या शेअर्समध्ये ७२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. 
 

Web Title: pharmaceutical companies to prepare raised 7 thousand crore through ipo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.