Lokmat Money > बिझनेस न्यूज > PNB Scam: मेहुल चोक्सी अँटिग्वामधून बेपत्ता; क्युबामध्ये पळाल्याचा अंदाज

PNB Scam: मेहुल चोक्सी अँटिग्वामधून बेपत्ता; क्युबामध्ये पळाल्याचा अंदाज

मेहुल चोक्सी आता अँटिग्वामधून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 04:54 PM2021-05-25T16:54:39+5:302021-05-25T16:56:40+5:30

मेहुल चोक्सी आता अँटिग्वामधून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे.

pnb scam accused mehul choksi got missing from antigua says ad vijay aggarwal | PNB Scam: मेहुल चोक्सी अँटिग्वामधून बेपत्ता; क्युबामध्ये पळाल्याचा अंदाज

PNB Scam: मेहुल चोक्सी अँटिग्वामधून बेपत्ता; क्युबामध्ये पळाल्याचा अंदाज

Highlightsमेहुल चोक्सी अँटिग्वामधून बेपत्तास्थानिक पोलीस स्थानकांत तक्रारक्युबामध्ये पळाला असल्याचा संशय

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेच्या १४ हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेला मेहुल चोक्सी आता अँटिग्वामधून बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. चोक्सीची शोध मोहीम सुरु असून तो क्युबामध्ये पळाला असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. (pnb scam accused mehul choksi got missing from antigua says ad vijay aggarwal)

मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करण्याबाबत केंद्र सरकार आणि अँटिग्वा सरकारमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, याचा अंदाज आल्यामुळे मेहुल चोक्सी अँटिग्वामधून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. अँटिग्वासह अन्य कॅरेबियन देशांचे नागरिकत्व चोक्सीकडे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मेहुल चोक्सी बेपत्ता झाल्याची माहिती चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी दिली आहे. 

मेहुल चोक्सी रविवारपासून बेपत्ता

पीएनबी बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मेहुल चोक्सीने भारतातून पळ काढत अँटिग्वा आणि बाबुर्डा या देशांमध्ये लपून राहिल्याची माहिती मिळाली होती. अँटिग्वा येथील स्थानिक वृत्त एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, मेहुल विवारपासून बेपत्ता आहे. रविवारी २३ मे रोजी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी चोक्सी निवासस्थानातून कारमधून बाहेर पडताना दिसून आला आहे. तेव्हापासून तो त्या ठिकाणी नाही त्यामुळे पोलीसांनी चोक्सीचा शोध सुरू केला आहे.

आता जिल्हा बॅंकांच्या विलीनीकरणासाठी RBI ची परवानगी अनिवार्य; गाइडलाइन्स जारी

स्थानिक पोलीस स्थानकांत तक्रार

अँटिग्वामधील जॉन्सन पॉइंट पोलीस स्थानकांत मेहुल चोक्सीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून, चोक्सी दिसल्यास कळवण्याचे आवाहन पोलिसांनी स्थानिक जनतेला केले आहे. 

क्युबामध्ये पळाला असल्याचा संशय

मेहुल चोक्सीकडे अँटिग्वाचे नागरिकत्व असले, तरी त्याचे शेजारील देश क्युबामध्ये आलिशान घर आहे. तो क्युबामध्ये पळून गेल्याचा संशय आहे. क्युबामधील स्वतःच्या घरात तो सध्या राहत असल्याचे बोलले जाते. गुंतवणूक कराराअंतर्गत चोक्सीने २०१७ मध्ये कॅरेबियन देशांचा पासपोर्ट आणि नागरिकत्व मिळवले होते.
 

Web Title: pnb scam accused mehul choksi got missing from antigua says ad vijay aggarwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.