नवी दिल्ली – येणाऱ्या काळात खासगी कंपन्याकडूनही LPG सिलेंडर घेऊ शकाल. त्याची तयारी सध्या सुरु आहे. आतापर्यंत केवळ ३ सरकारी कंपन्याच गॅस वितरणाचं काम करत होत्या. परंतु भविष्यात खासगी कंपन्यांनाही हा अधिकार मिळण्याची शक्यता आहे. पूर्वीप्रमाणे गॅस सिलेंडरवर मिळणारी सब्सिडी कमी झाल्याने या क्षेत्रात फायदा होण्याचा अंदाज कंपन्यांना आहे. त्यामुळे खासगी कंपन्या गॅस वितरण क्षेत्रात यासाठी स्वारस्य घेत आहेत.
LPG क्षेत्रात अनेक बड्या कंपन्या पुढे येण्यास उत्सुक आहेत. कमी सब्सिडीमुळे अनेक कंपन्यांनी या क्षेत्रात प्रवेश करण्याचं ठरवलं आहे. यात रिलायन्स गॅस, गोगॅस, प्युअर गॅस सारख्या कंपन्यांची यासाठी नावं पुढे आली आहेत. या कंपन्या गॅस क्षेत्रात आधीपासून सक्रीय आहेत. परंतु येणाऱ्या काळात त्या वेगाने बिझनेस वाढवू शकतात. या खासगी कंपन्यांचं लक्ष व्यावसायिक LPG गॅसवर आहे. सब्सिडीचा लाभ केवळ सरकारी ऑयल मार्केटिंग कंपन्यांनाच मिळतो.
सब्सिडी कमी झाल्याचा कंपन्यांना फायदा
जगभरातील बाजारात जेव्हापासून LPG च्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. तेव्हापासून भारत सरकारने सब्सिडी देणं कमी केले आहे. मे २०२० पासून सब्सिडी जवळपास देणं बंद करण्यात आलं आहे. आता इंडियन ऑयल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या तीन सरकारी कंपन्यांनाच सब्सिडी रेटवर LPG सिलेंडर दिला जातो. ग्राहकाला एलपीजीचे पूर्ण पैसे द्यावे लागतात त्यानंतर त्यांच्या बँक खात्यात सब्सिडीचे पैसे जमा केले जातात. आता देशात जितकी LPG उत्पादन केले जाते ते सर्व सरकारी ऑयल कंपन्यांना दिले जाते. असं असतानाही भारतात ५० टक्क्याहून जास्त LPG परदेशातून आयात करावा लागतो.
काही खासगी कंपन्या रिलायन्स गॅस आणि सुपर गॅस जे LPG सिलेंडर विकतात त्यांचे उद्योग फार कमी आहे. सब्सिडी नियमात उद्योग चालणार नाही त्यामुळे बिझनेस छोटा ठेवला आहे. आता सब्सिडी बंद झाल्याने कंपन्या बिझनेस वाढवण्याच्या विचारात आहेत. रिलायन्स गॅसने सरकारकडून परवानगी मागितली आहे की, त्यांना त्यांचे एकूण LPG उत्पादन देशातील बाजारात विकण्यासाठी मंजुरी मिळावी. अशीच आणखी एक कंपनी नयारा एनर्जीही घरगुती गॅस सिलेंडर बाजारात विकण्याची इच्छा दर्शवत आहे. खासगी कंपन्यांचे दर पाहून यापैकी कुठल्याही एका कंपनीला परवानगी मिळू शकते. कंपनीच्या नंबरवर फोन केल्यानंतर त्यांचे एजेंट घरी येतील आणि गॅस सिलेंडर सेटींग करून देतील.