रिअल इस्टेट कंपनी प्रोझोन इंटू प्रॉपर्टीजच्या (Prozone Intu Properties) शेअरने गेल्या एका आठवड्यात 100 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. अर्थान गुंतवणूकदारांचापैसा केवळ 7 ट्रेडिंग सत्रांत डबल झाला आहे. तर या कंपनीच्या शेअरने एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 150% रिटर्न दिले आहे.
प्रोझोन इंटू प्रॉपर्टीजच्या शेअरमध्ये तेजी -
प्रोझोन इंटू प्रॉपर्टीजच्या शेअरचा भाव 26 मेरोजी एनएसईवर 20.70 रुपये एवढा होता. हा भाव एका आठवड्यात 4 जूनला वाढून 42.15 रुपयांवर पोहोचला. अर्था 7 ट्रेडिंग सेंशनमध्ये शेअरचा भाव दुप्पट झाला आहे. तर एक महिन्यापूर्वी 6 मेरोजी हा शेअर एनएसईवर 16.80 रुपये होता. (Photo: Getty Images)
Ambani VS Adani: मुकेश अंबानींचा 'ताज' धोक्यात, गौतम अदानी लवकरच होऊ शकतात भारताचे नवे 'सरताज'
कंपनीत राकेश झुनझुनवाला यांची मोठी गुंतवणूक -
देशातील दोन दिग्गज गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. Prozone Intu Propertiesमध्ये शेअर बाजारातील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचा वाटा 2.06% एवढा आहे. त्यांनी मार्च तिमाहीच्या वेळीच या कंपनीला आपल्या पोर्टफोलियोशी जोडले आहे.
राधाकिशन दमानी यांच्याकडेही कंपनीचे शेअर -
तसेच दुसरीकडे दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्याकडेही या कंपनीचे 1.26 टक्के शेअर्स आहेत. या दोन्ही गुंतवणूकदारांना मोठा अनुभव आहे. या दोघांनाही बाजाराची नस ओळखता येते. कुठल्याही कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी तिच्या व्यापाराची संपूर्ण माहिती मिळवतात. यांच्या पोर्टफोलियोमध्ये असलेले सर्वच शेअर्स चांगले रिटर्न देणारे आहेत.
२५ हजारांत सुरू करा हा व्यवसाय, सरकार देणार ५० टक्के सब्सिडी, दरमहा ३ लाखांपर्यंत होईल कमाई
प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज कर्ज मुक्त कंपनी -
प्रोझोन इंटू प्रॉपर्टीज कंपनीवर कुठल्याही प्रकारचे कर्ज नाही आणि या कंपनीचे अॅसेट्स 2000 कोटींपेक्षाही अधिक आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजीनंतर कंपनीचे मार्केट कॅप. वाढून 643 कोटी रुपयांवर गेले आहे. या शेअरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने अपर सर्किट लागत आहे. एवढेच नाही तर, गेल्या शुक्रवारी अपर सर्किटनंतर हा Penny Stock आपल्या एका वर्षातील (52 आठवडे) सर्वोच्च स्थरावर पोहोचला आहे. मुंबईतील या रिअल इस्टेट कंपनीची स्थापना 2007 मध्ये झाली होती.
टीप - कुठल्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराकडून अवश्य सल्ला घ्यावा. रिसर्च न करता कुठल्याही शेअरमध्ये गुंतवणूक करणे टाळा...