Lokmat Money > बिझनेस न्यूज > या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

Loan Campaign: असे अनेक लोक आहेत जे आपल्या कमाईतून आपल्या आर्थिक गरजा भागवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांना पैशांची गरज भागवण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:54 IST2025-04-24T12:53:44+5:302025-04-24T12:54:49+5:30

Loan Campaign: असे अनेक लोक आहेत जे आपल्या कमाईतून आपल्या आर्थिक गरजा भागवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांना पैशांची गरज भागवण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं.

punjab national bank psu started a loan campaign Loans will be available at low interest rates and zero charges when is the last date | या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

Loan Campaign: असे अनेक लोक आहेत जे आपल्या कमाईतून आपल्या आर्थिक गरजा भागवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांना पैशांची गरज भागवण्यासाठी बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं. काही लोक घर घेण्यासाठी गृहकर्ज घेतात, तर काही जण कार खरेदी करण्यासाठी कार लोन घेतात. तर काही लोक आपल्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन घेतात. देशातील विविध बँकांकडून वेगवेगळ्या व्याजदरानं विविध प्रकारची कर्जे दिली जातात. आता देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सरकारी बँकेनं कर्जासाठी एक कॅम्पेन सुरू केलंय. पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबीनं हे लोन कॅम्पेन सुरू केलंय. 'पीएनबी निर्माण २०२५' असे या कॅम्पेनचं नाव आहे. चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.

मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

पीएनबी निर्माण २०२५ लोन कॅम्पेन

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या पीएनबीनं मर्यादित लोकांसाठी 'पीएनबी निर्माण २०२५' नावाचं विशेष रिटेल लोन कॅम्पेन सुरू केलं आहे. ही मोहीम २० जून २०२५ पर्यंत चालणार आहे. या मोहिमेत लोकांना स्वस्त व्याजदरात आणि अनेक सवलतींसह कर्ज दिलं जाईल. या कॅम्पेनमध्ये होमलोन, कार लोन आणि एज्युकेशन लोन यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. यामध्ये तुम्हाला अतिशय कमी व्याजदरात कर्ज मिळू शकतं.

काय आहे खास?

पीएनबी निर्माण २०२५ कॅम्पेनमध्ये देण्यात आलेल्या कार आणि होम लोनमध्ये ग्राहकांकडून कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जाणार नाही. त्याचबरोबर डॉक्युमेंटेशन चार्जेसही शून्य आहेत. एवढंच नाही तर याअंतर्गत ग्राहकांना ठराविक रकमेपेक्षा जास्त रकमेच्या गृहकर्जावर वकिलाकडून नॉन इन्कमबेन्सी सर्टिफिकेट किंवा एनईसीचाही लाभ मोफत मिळणार आहे.

Web Title: punjab national bank psu started a loan campaign Loans will be available at low interest rates and zero charges when is the last date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.